उद्धव ठाकरे म्हणाले आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आमचा आवाज दाबणार कधी जन्माला येऊ शकत नाही.You stay forever, we can see Rahulji very clearly in Uddhavji; Nitesh Rane’s strong attack on Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल राज्यात दसरा उत्सहात साजरा होताना दिसत होता. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर राजकीय टीका टिप्पणी देखील पहायला मिळाली. मुंबईत शिवसेना आपला दसरा मेळावा कार्यकर्त्यांबरोबर साजरा करते. ही शिवसेनेची परंपरा आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
यावेळी बोलताना ते म्हणाले आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आमचा आवाज दाबणार कधी जन्माला येऊ शकत नाही. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, काहीजण माझं भाषण संपण्याची वाट पाहत आहेत भाषण कधी थांबतय आणि कधी एकदा चिरकतोय अशी काहींची अवस्था झाली आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.
मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला उत्तर देत नितेश राणे म्हणाले की, दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही.
After Dussehra speech.. With full confidence I can say.. Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!! Koi doubt nahi!! — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) October 15, 2021
After Dussehra speech..
With full confidence I can say..
Humko uddhavji mein Rahulji ekdum clear dekte hain!!!
Koi doubt nahi!!
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) October 15, 2021
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App