Yashwant Jadhav Diary : संजय राऊत म्हणतात, यशवंत जाधवांची डायरीच खोटी; शिवसेनेत डायरी लिहिण्याची पद्धत नाही!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या यशवंत जाधव यांची डायरी, मातोश्रीला दिलेले 50 लाखांचे घड्याळ आणि दोन कोटींची रक्कम याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यशवंत जाधव यांचे डायरीच खोटी आहे. शिवसेनेत डायरी लिहिण्याची पद्धतच नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. यशवंत जाधव हे आपल्या आईला घड्याळ भेट देऊ शकत नाहीत का?, दान धर्मासाठी रक्कम देऊ शकत नाहीत का? तशी त्यांनी रक्कम त्यांनी दिली असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. Yashwant Jadhav Diary: Sanjay Raut says, Yashwant Jadhav’s diary is false; There is no method of writing diary in Shiv Sena !!

यशवंत जाधव यांच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सापडलेल्या डायरीतील मातोश्री वर जोरदार चर्चा सुरु आहे. या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिले असल्याचा उल्लेख आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मातोश्री म्हणजे यशवंत जाधव यांची आई असू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी त्यांचे वक्तव्य पाहिले, त्यांनी आपल्या आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील, असं राऊत म्हणाले.



डायरी हा काही पुरावा नाही

शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावे आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असे राऊत म्हणाले.

खोट बोला पण रेटून बोला

पुढे संजय राऊत म्हणाले की, देवाच्या चरणी सर्वांनी खरं बोलायला हवे. तुम्ही जर हिंदुत्व मानत असाल, तर देवाच्या दरबारात आपण किती खरे बोलतो हे काही लोकांनी तपासायला हवे. महाराष्ट्रात षडयंत्र सुरु आहेत, कटकारस्थाने सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करणे सुरू आहे. सध्या विरोधी पक्षाचे खोटे बोला पण रेटून बोला ही परंपरा सुरू आहे, असे शरसंधान राऊत यांनी साधले.

Yashwant Jadhav Diary: Sanjay Raut says, Yashwant Jadhav’s diary is false; There is no method of writing diary in Shiv Sena !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात