चिंताजनक : मुलींवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराच्या आणि शोषणनाच्या घटनेत वाढ


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : जग कितीही पुढे जात आहे, सुधारत आहे असं म्हटलं तरी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार मात्र कमी झालेले नाहीयेत. आपण रोज कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडल्याचे वाचतोच. मन सुन्न करणाऱ्या या घटनांनी खूप त्रास होतो.Worrying: Increased incidence of sexual abuse and exploitation of girls

नुकताच कोल्हापूरमध्ये एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, जास्तीत जास्त सेक्सुअल असॉल्टच्या किंवा लैगिंक शोषणनाच्या ज्या केसेस पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत, त्या जास्तीत जास्त संबंधित मुलीच्या परिचयातील व्यक्तीनकडून झालेल्या आहेत.2019 पासून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे, असे देखील या निरीक्षणात पुढे आले आहे. 2019 मध्ये लैगिंक अत्याचाराच्या एकूण 114 केसेस दाखल झाल्या होत्या. 2020 मध्येही हा आकडा एक 114 इतका होता. तर 2021 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या काळात एकूण 162 लैगिंक अत्याचाराच्या केसेस दाखल झालेल्या आहेत.

यावर्षी नोव्हेंबर अखेर एकूण 316 लैगिंक शोषणनाच्या केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. 2020 मध्ये 272 केसेस दाखल झाल्या होत्या तर 2019 मध्ये 205 केसेस दाखल झाल्या होत्या. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे अश्या बऱ्याच गुन्हेगारांना पकडण्यात आलेले आहे. तर 138 लैगिंक अत्याचाराच्या केसेसमध्ये असे आढळून आलेले आहे की आरोपी हे तक्रार दाखल करणाऱ्या मुलीचे मित्र, शेजारी, घरातील व्यक्ती किंवा कलीग आहेत.

लैगिंक अत्याचाराच्या 21 केस मध्ये असे आढळुन आले आहे की हा लैगिंक अत्याचार त्यांच्या पालकांनी केलेला आहे. तर 32 केसेस मध्ये अपरिचित व्यक्तींनी हा अत्याचार केलेला आहे.

तर लैंगिक शोषणाच्या एकूण 280 केसेसमध्ये तक्रारकर्ती महिलेच्या परिचित व्यक्तींनीच हा अत्याचार केलेला आहे. 31 केसेस मध्ये पालकांनीच हा अत्याचार केलेला आहे. तर 5 केसेसमध्ये अपरिचित व्यक्तींनी हा अत्याचार केलेला आहे.

जिल्ह्याचे पोलीस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लवकरच आम्ही जिल्हा परिषद शाळा आणि कॉलेजमध्ये याविषयी जागरुकता निर्माण करण्याचे कार्यक्रम घेण्याचा विचार करत आहोत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्यतेमुळे सध्या शाळा बंद आहे. त्यामुळे आम्ही शाळा लवकरात लवकर चालू होण्याची वाट पाहत आहोत.

Worrying: Increased incidence of sexual abuse and exploitation of girls

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण