विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचे आहे? हे जर आपल्याला अगदी लहान वयात कळाले तर आयुष्य सुखकारक होतं. बरेच लोक आपल्या करिअरचा ऐन काळ त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात घालवतात. काही काळाने जाणीव होते की हे काम तर माझ्यासाठी नाहीये. या गोष्टीवर आधारित एक सिनेमा आला होता 3 इडियट्स. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. बॉक्स ऑफिसच्या किती कमाई केली यापेक्षा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला संदेश लोकांना भावाला होता.
This scene in 3 Idiots also happened in R Madhavan’s real life, the actor himself revealed the story
हा संदेश संपूर्ण तरुण पिढीला आपलेसे करणारा होता. इथे प्रत्येकाला आपल्या पॅशनला आपले काम बनवायचे आहे. पण मुळात आपले पॅशन काय आहे हीच गोष्ट आपल्याला क्लिअर नसते. या चित्रपटामध्ये एक सीन होता तेथे आर माधवनला वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करायची असते आणि त्याच्या वडिलांची इच्छा असते की त्याने इंजिनीअरिंग करावे व नोकरी करावी. नोकरी करून आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगावे.
३ इडियट्स सिनेमापासून प्रेरित होऊन २१ वर्षीय सायकॉलॉजीच्या विद्यार्थिनीने मोहलीत सूरू केले अनोखे कॅफे
तुम्हाला माहीतेय का? खऱ्या आयुष्यामध्ये देखील आर माधवनच्या आयुष्यामध्ये अशीच गोष्ट घडली होती. आर माधवनने देखील इंजिनीअरिंगला अॅडमिशन घेतले होते. पण जेव्हा त्याला कळाले की आपल्याला एकाच प्रकारचे काम आयुष्यभर करायचे नाहीये. तेव्हा त्याने इंजिनीअरिंग सोडले आणि अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.
जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या आईवडिलांना सांगितली होती, तेव्हा त्याचे वडीलदेखील थ्री इडियट्स मध्ये दाखवण्यात आलेल्या आर माधवच्या वडिलांसारखेच उदास,हताश झाले होते. त्यांनी तर असे देखील म्हटले होते की, माझ्याकडून अशी काय चुक झाली की तू असा वागत आहेत? मागे एका इंटरव्यूमध्ये आर माधवनने या गोष्टींबाबत खुलासा केला होता. पण 3 इडियट्स चित्रपटामध्ये जसे शेवटी ऑल इज वेल म्हटलं की सगळं चांगलं होतं. तसंच आर माधवनच्या बाबतीतदेखील झालेलं आहे. त्याने एक यशस्वी करिअर चित्रपटसृष्टीमध्ये उभं केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App