पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण


शाळेची लॅब फी नाकारायला गेलेल्या पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण झाली.त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शाळेत ठिय्या आंदोलन केले.


प्रतिनिधी

पुणे – शाळेची लॅब फी नाकारायला गेलेल्या पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण झाली. ही घटना बिबवेवाडी येथील क्‍लाएंट मेमोरीअल हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पालकांच्यावतीने तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.Women Bouncer Beating Student parents in pune school

याप्रकरणी मंगेश गायकवाड फिर्याद देत आहेत. त्यांना महिला बाऊंन्सरकडून मारहाण झाली. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी शाळेकडू अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मंगेश यांचा मुलगा क्‍लाएंट मेमोरीअल हायस्कूमध्ये शिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षापासून करोनामुळे शाळा ऑन लाईन होत आहे. मात्र तरीही लॅब आणि लायब्ररीची फी शाळेकडून घेण्यात येत आहे. तसेच शाळेची फी ही वाढवण्यात आली आहे. यामुळे पालकांनी दोन दिवसांपुर्वी मुख्यध्यापकांची भेट घेतली होती.

मात्र ही भेट समाधानकारक झाली नाही, शाळा फी कमी करण्यास तयार नव्हती. यानंतर पुन्हा एकदा मंगेश गायकवाड आणि इतर पालक मुख्यध्यापकांना भेटण्यासाठी शाळेत गेले होते. मात्र शाळेच्या बाऊंन्सरनी त्यांना भेट घेऊ दिली नाही. यामध्ये बाऊंन्सर आणि पालकांमध्ये वादावादी झाली. यातच एका महिला बाऊंन्सरने मंगेश गायकवाड यांना धक्काबुक्की केली.

यासंदर्भात माहिती देताना भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतिक देसरडा यांनी सांगितले, मागील दोन वर्षात करोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. पालकांकडे फी भरायला पैसे नाहीत. अशातच शाळेने फी वाढवली आहे. याला विरोध करण्यासाठी पालक गेले असता ही घटना घडली. मुळातच शाळेमध्ये बाऊंन्सर ठेवणे अयोग्यच आहे.

Women Bouncer Beating Student parents in pune school

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात