पुण्यात लसीचा साठा संपला ! ; 150 लसीकरण केंद्रे बंद राहणार


वृत्तसंस्था

पुणे : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, पुण्यात लशीचा साठा नसल्यामुळे बुधवारी (ता. 28) सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. Vaccine stocks run out in Pune 150 vaccination centers will remain closed

पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मिनी लॉकडाऊन लावला होता. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर राज्य सरकारने भर दिला आहे. पण, पुण्यातच लसीचा साठा संपल्यामुळे पुण्यातील 150 लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहे.

कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार

पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना लस मिळणार नाही. मात्र , कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यांच्यासाठीच लसीकरण सुरू आहे. अन्य लोकांना मात्र लस मिळणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Vaccine stocks run out in Pune 150 vaccination centers will remain closed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात