कोरोनाच्या मुकाबल्यासाठी भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. यात थायलंडचा देखील समावेश आहे. आज थायलंडकडून ऑक्सिजनचे कंटेनर उपलब्ध झाले. भारतीय हवाई दलाच्या विमानाने बँकॉंकडून ऑक्सिजन कंटेनर एअरलिफ्ट केले. तसेच ब्रिटनमधून देखील १०० व्हेंटिलेटर आणि ९५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर दाखल झाले. Whole world giving support to India for covid war



देशात मेडिकल ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा पुरवठा करण्यासाठी कंटेनरची गरज भासत आहे. गृहमंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर म्हटले की, काल रात्री भारतीय हवाई दलाने बँकॉक विमानतळावरुन ऑक्सिजन कंटेनर एअरलिफ्ट केले. तिन्ही विमाने पश्चिऑम बंगालमध्ये उतरली आणि तेथून ते कंटेनर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पावर नेण्यात आले. तेथून जादा मागणी असलेल्या भागात कंटेनर रवाना करण्यात येत आहेत.

अमेरिकेशिवाय जगातील अन्य देशांनी देखील भारताला मदत करण्यास सुरवात केली आहे. सर्वात अगोदर सिंगापूरने भारताला चार क्रायोजेनिक टँकरसह २५० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर दिले. संयुक्त अरब अमिरातीने ऑक्सिजनचे रिकामे सात टँकर पाठवले. भारताला कोरोनाविरोधातील लढाईत पाठिंबा देण्यासाठी दुबईत बुर्ज खलिफा येथे तिरंगा ध्वजाची प्रकाशयोजना करण्यात आली. ब्रिटनने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटरसह ६०० वैद्यकीय उपकरणे पाठवण्याची घोषणा केली. त्यात १२० व्हेंटिलेटरचा समावेश आहे. हॉंगकॉंगहून ८०० ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर मागवले आहेत. सौदी अरेबियाने ८० मेट्रिक टन ऑक्सिजन पाठवले आहे. रशियाने रेमडेसिव्हिर आणि अन्य वैद्यकीय मदत करण्याचे जाहीर केले आहे.

Whole world giving support to India for covid war

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात