उदयनराजे म्हणाले , ‘ जरंडेश्वार’ प्रकरणी जबाबदार असलेल्या संचालकांकडून वसुली व्हावी


सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली.Udayan Raje said, recovery should be made from the director responsible for ‘Jarandeshwar’ case


विशेष प्रतिनिधी

सातारा : जरंडेश्वार कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती. आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करण्याची शक्यता आहे.जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी, असे स्पष्ट करून हे निवडून बँकेवर जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय. मी जाग अडवली असेल,

तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसे झाले तर माझी सपशेल माघार असेल, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या राष्ट्रवादीचे संचालक व अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.



सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली. जरंडेश्वार शुगर मिल कर्ज प्रकरणाची माहिती मागितली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की ‘जरंडेश्वार शुगर मिल’ला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती.

बँकेत जागा अडवणाऱ्यांना संधी नाही या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, की बँकेत कोणी जागा अडवली हे त्यांना माहिती आहे. बँकेची चौकशी लागली तरी त्यांना याबाबत माहिती दिसत नाही. आत्ता निवडणूक लागलेली असल्यामुळे बँकेत त्यांचे येणे जाणे सुरू झाले असल्याची टीका त्यांनी शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता केली.

Udayan Raje said, recovery should be made from the director responsible for ‘Jarandeshwar’ case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात