ईडी कारवायांवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया, म्हणाले हिम्मत असेल तर ईडी ने माझ्याकडे यावं

विशेष प्रतिनिधी

सातारा: आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयकडून आणि अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब, अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक अश्या अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे.

Udayan Raje bhosle angry reaction on Ed and BJP

भाजपकडून या तपास यंत्रणांचा राजकारणासाठी वापर होतो आहे असे आरोप लावले जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये यावरून वादविवाद सुरू आहेत. यासंदर्भात आता खासदार उदयनराजे भोसले यांनी तू कर हसल्यासारखे आणि मी करतो रडल्यासारखे सदृश्य भाष्य केले आहे.


उदयनराजे यांनी चालविला तराफा कोयना जलाशयात लुटला आनंद


या संदर्भात बोलताना उदयनराजे भोसले यांनी फक्त इतर पक्षांवर टीका न करता भाजपवरही निशाणा साधला आहे. हिम्मत असेल तर ईडीला माझ्याकडे येऊ दे, मी त्यांना सर्वांची यादी देतो असं ते म्हणाले. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत आणि पुराव्यासकट मी यादी द्यायला तयार आहे.

या सगळ्यामागे भाजपचे कारस्थान आहे का असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, यामध्ये कोणीही असू दे मी सर्वांची यादी द्यायला तयार आहे. ते पुढे म्हणाले, “सोयीप्रमाणे एकमेकांचे झाकायचं आणि काढायचं हे राजकारण आता बास झाले.”

Udayan Raje bhosle angry reaction on Ed and BJP

महत्त्वाच्या बातम्या