उदयनराजे यांनी चालविला तराफा कोयना जलाशयात लुटला आनंद

वृत्तसंस्था

सातारा : साताऱ्याचे खासदार, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दरे गावी घेतली भेट घेतली. त्यांच्या गावी जात असताना कोयना जलाशयात तराफा चालविण्याचा आनंद लुटला. Satara MP Udayan Raje Run raft in koyana water back

खासदार उदयनराजे भोसले यांनी स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जावळीचे सुपुत्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची दरे येथे सदिच्छा भेट घेतली.

राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या गावी जात असताना खासदार उदयनराजे यांनी कोयना जलाशयातील तराफा चालविण्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास कामांबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्याचे सांगितले आहे.

– खासदार उदयनराजे यांनी चालविला तराफा
– कोयना जलाशयात तराफा चालविण्याचा आनंद
– जरे या गावी जाताना तराफ्याचे केले सारथ्य
– स्थानिक संस्था निवडणुकीसाठी गाठीभेटी सुरु
– एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांची घेतली भेट

Satara MP Udayan Raje Run raft in koyana water back