सरकारने आता तरी जागे व्हावे…! छत्रपति संभाजीराजेंच्या ठाकरे सरकारला सुचना-तर मी सदैव तुमच्यासाठी लढायला तयार म्हणतं तरूणांना कळकळीचे आवाहन ….


सरकारने आता तरी जागे व्हावे…! छत्रपति संभाजीराजेंच्या ठाकरे सरकारला सुचना-तर मी सदैव तुमच्यासाठी लढायला तयार म्हणतं तरूणांना कळकळीचे आवाहन ….

मराठा आरक्षण नसल्यानं एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली.


विशेष प्रतिनिधी

कोल्हापुर: छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केले आहे. मराठा समाजानं अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलनं केली तरी सरकारकडून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही वेळोवेळी पदरी निराशाच पडत असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.परतूर तालुक्यातील येनोरा ( जि. जालना ) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली.The government should wake up now …! Chhatrapati Sambhaji Raje’s Suggestion to Thackeray government – always ready to fight for you, heartfelt appeal to the youth ….

आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे.

आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे.

प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. सरकारला माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी.

सदाशिव भुंबर यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजातील तरूणांना मी कळकळीची विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हिच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिम्मत हरू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ.

The government should wake up now …!  Chhatrapati Sambhaji Raje’s Suggestion to Thackeray government –  always ready to fight for you, heartfelt appeal to the youth ….

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात