पुणे विमानतळावर पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जाम


विशेष प्रतिनिधी

पुणे: पुणे विमानतळावर बरेच लोक पाणी साचल्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकले. एका नागरिकाने सांगितले की, पुणे विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे ४ किलोमीटर चा रस्ता पार करण्यासाठी त्याला २ तास लागले. पुण्यातील लोहगाव, शिवाजी नगर आणि चिंचवड येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव शहर धानोरी, शिवाजीनगर आणि इतर भागांमध्ये पाणी साचल्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाले. त्यामुळे विमानतळाकडे जाता येत नव्हते व सार्वजनिक वाहतूक ही ठप्प झाली होती. त्यामुळे जवळजवळ तीनशे फ्लायर्सवर परिणाम झाला.

Traffic Jam due to water logging in Pune airport

सोनाली राजोरे या त्यांच्या घरातील ९० वर्षांवरील वृध्द ग्रहस्थांसह अडीच तासापेक्षा जास्त वेळ विमानतळावर अडकले होते. राजोरे यांनी सोशल मीडियावर पण प्लीज मदत करा तसेच वाहतुकीची व्यवस्था कोणी करेल का असे लिहिले होते. कॅब, प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षा उपलब्ध नव्हत्या. साडेआठला सुरू झालेला त्यांचा हा संघर्ष साडेबारा वाजता संपला. रस्ते मोकळे झाल्यानंतर त्या १० वाजता घरी पोचल्या.


पुणे विमानतळावरील उड्डाणे १५ दिवसांकरिता बंद


या सर्व गोंधळाला रस्त्यांची अपूर्ण कामे जबाबदार आहेत. विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी म्हणाले की, “मुसळधार पाऊस आणि रस्ता दुरुस्तीची विमानतळाजवळ चालू असलेली कामे यामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे. वाहतूक पोलीस व आमचे अधिकारी यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम केले.” एका गृहस्थाने ट्विट केले आहे की, तुम्ही जर लोहगाव, धानोरी एरियात गेलात तर तुम्ही पुण्याला स्मार्ट सिटी म्हणू शकणार नाही. राजकीय पक्षांनी या विभागाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. चांगले रस्ते नाहीत. ड्रेनेज व्यवस्था नाही. पाणीपुरवठा सुरळीत नाही तसेच वाहतूक व्यवस्थाही चांगली नाही. पण विमाननगर मध्ये प्रोपर्टी टॅक्स जास्त आकारला जात आहे. सतीश पिके या नागरिकानी सांगितले की, पुढे विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते जाम झाले होते आणि ते ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २ तास रस्त्यावर अडकले होते. महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार हेही या पावसामुळे झालेल्या होते ट्रॅफिक जाम मध्ये अडकले होते असे समजते.

Traffic Jam due to water logging in Pune airport

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती