पुणे विमानतळावरील उड्डाणे १५ दिवसांकरिता बंद


लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार असल्याची माहिती पुणे एअरपोर्ट अथोरिटीजने ट्विटरद्वारे दिली आहे. याकाळात एकही विमान उड्डाण करू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही.Flights at Pune Airport closed for 15 days


विशेष प्रतिनिधी

पुणे: लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून 16 ऑक्टोबरपासून 15 दिवस विमानतळावरील उड्डाणे बंद राहणार असल्याची माहिती पुणे एअरपोर्ट अथोरिटीजने ट्विटरद्वारे दिली आहे. याकाळात एकही विमान उड्डाण करू शकणार नाही किंवा उतरू शकणार नाही.

याबाबत पुणे एअरपोर्ट अथोरिटीजचे संचालक संतोष ढोके डेली सिटी न्यूज सोबत बोलताना म्हणाले, हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 मध्ये विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे त्यामूळे 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. हे काम भारतीय हवाई दलाकडून केले जाणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर, रात्री 8 ते 30 ऑक्टोबर, सकाळी 8 पर्यंत विमानतळ बंद राहणार आहे.

लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने फक्त 10 दिवस अगोदर सांगितल्याने प्रवाशांची मोठीया अडचण होणार आहे. या निर्णयाचा फटका 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान तिकिट रिजर्वेशन केलेल्या प्रवाशांना बसणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या काळात रात्रीची उड्डणे बंद केल्याने हजारो प्रवाशांना तिकिटे रद्द करावी लागली होती. आताही तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना तिकिट रिजर्वेशन रद्द करण्यास आणि त्याचा परतावा परत मिळवण्यास मोठी दमछाक करावी लागणार आहे. दरम्यान, यामुळे विमान कंपन्यांचे आणि प्राधिकारणाचेही आर्थिक नुकसान होणार आहे.

Flights at Pune Airport closed for 15 days

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण