Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या

Aryan Khan drugs case Sherlyn Chopra claim that the wives of Bollywood stars were taking white powder at shahrukhs party

drugs case : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीप्रकरणी मुंबई ते गोवा या क्रूझवरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खानसह आठ जणांवर ड्रग्ज घेतल्याचा आणि ड्रग्ज व्यवहारात गुंतल्याचा आरोप आहे. आर्यन खानसह सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा केला आहे. Aryan Khan drugs case Sherlyn Chopra claim that the wives of Bollywood stars were taking white powder at shahrukhs party


प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीप्रकरणी मुंबई ते गोवा या क्रूझवरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खानसह आठ जणांवर ड्रग्ज घेतल्याचा आणि ड्रग्ज व्यवहारात गुंतल्याचा आरोप आहे. आर्यन खानसह सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा केला आहे. शर्लिनने दावा केला आहे की, बॉलिवूड स्टार्सच्या बायका शाहरुख खानच्या पार्ट्यांमध्ये वॉशरूममध्ये पांढरी पावडर घेत असत.

शर्लिन चोप्राने तिच्या जुन्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानशी संबंधित एका पार्टीचा उल्लेख करताना दिसत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा यांनी एका पार्टीबद्दल सांगितले आहे की, “जेव्हा मी नाचताना थकले, तेव्हा मी वॉशरूमच्या दिशेने गेले. मी वॉशरूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडला तेव्हा आतले दृश्य पाहून मला धक्का बसला. मी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी तर आले नाही ना असेच वाटले. तिथे बॉलिवूड स्टारची पत्नी आरशासमोर उभी राहून पांढरी पावडर घेत होती.”

धक्काच बसला.. – शर्लिन

शर्लिन चोप्रा पुढे म्हणते, ‘जेव्हा असे दृश्य माझ्या समोर आले, तेव्हा मला धक्का बसला. मी तिच्याकडे बघून हसले आणि तिच्याकडे दुर्लक्ष करणेच चांगले समजले. मी पाहिले की प्रत्येकजण स्वतःमध्ये हरवला होता. त्यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या मित्राला सांगून मी तिथून निघाले. त्या दिवशी मला समजले की बॉलिवूडमध्ये अशा पार्ट्या होत राहतात.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये खूप वेगाने व्हायरल होत आहे.

Aryan Khan drugs case Sherlyn Chopra claim that the wives of Bollywood stars were taking white powder at shahrukhs party

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण