तीन कृषी कायदे रद्द : सोशल मीडियावर पडले दोन तट, युजर्स म्हणतात, शेतकऱ्यांनो तुम्ही मुक्त झालात, पुन्हा सावकारांकडे अन् दलालांकडे जाण्यासाठी!


पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. विविध राजकीय पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु याचबरोबर केवळ पंजाब, हरियाणाचे तथाकथित शेतकरी सोडले तरी उर्वरित देशभरातून मात्र या कायद्यांचे स्वागतच करण्यात आले होते. पंतप्रधानांनी हा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करताच आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. Three Farm laws repealed social media Divided in To Two, users say, farmers you are free to go to moneylenders and brokers again


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. विविध राजकीय पक्षांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु याचबरोबर केवळ पंजाब, हरियाणाचे तथाकथित शेतकरी सोडले तरी उर्वरित देशभरातून मात्र या कायद्यांचे स्वागतच करण्यात आले होते. पंतप्रधानांनी हा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा करताच आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सोशल मीडियावर या निर्णयानंतर दोन गट पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. कृषी कायद्यांना आंधळा विरोध करणाऱ्यांचा विजय झाला असे काहींचे म्हणणे आहे, तर काहींनी हा अहंकारी सरकारचा पराभव म्हटले आहे.

 

शेतकरी संघटनेचे श्रीकांत उमरीकर यांनी यासंदर्भात आपल्या फेसबुक वॉलवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, शेतकऱ्यांच्या जीवनातील सर्वात काळा दिवस… झुंडशाहीपुढे शेपूटघालू केंद्र सरकारचा तीव्र निषेध…

त्यांच्या प्रतिक्रियेवर विविध कॉमेंट्स आल्या आहेत. दत्ता भानुसे यांनी लिहिले की, शेतकरी हितापेक्षा राजकारण महत्त्वाचं आहे हे सिद्ध झालं. आता यापुढे कोणतेही सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची हिंमत करणार नाही. श्रीपाद कुलकर्णी यांनी लिहिलं की, दुर्दैवी निर्णय, कृषी क्षेत्रातील सुधारणांना यामुळे मोठा धक्का बसला आहे.



राजेश शाह यांनी लिहिले की, ते चुकीच्या गोष्टीसाठी दिल्लीत १ वर्ष बसले. तुम्ही तुमच्या हक्कासाठी १ दिवसही रस्त्यावर येऊ शकले नाहीत. मोदीजी त्यांच्या पुढे हतबल झाले नाही झाले हा येणारा काळच ठरवेल पण सामान्य शेतकरी एकदा ही जाहीर समर्थन करण्यासाठी बाहेर पडला नाही ह्या गोष्टीचा कायम खेद राहील. यात सगळ्यात महत्त्वाची मेख म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःचा फायदा कळत नाही. शरद पवार सारख्या थापाड्या माणसाची त्यांना भुरळ पडते. टिकैतसारख्या दलालावर विश्वास ठेवला जातो, खलिस्तान्यांनी हातात नंग्या तलवारी घेऊन लोकांचे मुडदे पाडले त्याच ही समर्थन केलं जातं. तिरंगा खाली खेचला जातो, देशविरोधी घोषणा दिल्या जातात त्याच ही समर्थन केलं जातं. शेतकऱ्यांनो, तुम्ही आज मुक्त झालात.. आता तुम्ही परत सावकराकडे जाऊ शकता, दलालांकडे जाऊ शकता..

दरम्यान, तीन कृषी कायदे नेमके काय होते हे कुणी समूजन घेतलंय का?, त्यांचा शेतकऱ्यांच्या जीवनावर कोणता प्रभाव पडणार होता, हमीभावावर खरंच परिणाम होणार होता का? दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनातील शेतकरी हे आडत्यांच्या पाठिंब्यांवर तिथे बसले होते असा आरोप होतेाय. पण तरीही कृषी कायदे नेमकेपणाने शेतकऱ्यांना समजावे यासाठी काही प्रयत्न झाले का? ज्या दोन राज्यांतील शेतकऱ्यांचा आक्षेप होता, ते वगळता उर्वरित भारतातील ज्यांना कायदे पसंत होते, मान्य होते, त्यांचे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.

Three Farm laws repealed social media Divided in To Two, users say, farmers you are free to go to moneylenders and brokers again

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात