शेतकरी आंदोलनामुळे व्यापार-उद्योगांचे एक लाख कोटींचे नुकसान ; कृषी कायदा हा शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्याही हिताचा

कॅट (सीएआयटी) नुसार दिल्लीत दररोज 50 हजार ट्रक देशभरातील विविध राज्यांतून दाखल होतात आणि जवळपास 30 हजार ट्रॅक दिल्लीबाहेर जातात .या आंदोलनामुळे वस्तूंच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे .त्यामुळे व्यापारला मोठे नुकसान झाल्याची माहिती ‘ कॅट’ चे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली आहे .One lakh crore loss to trade and industry due to farmers agitation Agricultural law is in the interest of farmers 


विशेष प्रतिनिधी

नागपुर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे देशातील व्यापार उद्योगाला फटका बसत आहे .गेल्या ७३ दिवसांत व्यापार उद्योगाचे सुमारे एक लाख कोटींचे नुकसान आहे. दिल्लीत ३० हजार कोटींचा माल थांबला असून इतर राज्यांतून दिल्लीत येणारा ७० हजार कोटी रुपये किमतीचा मालही अडकला आहे, अशी माहिती  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी दिली.

दरम्यान असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे म्हणणे आहे की शेतकरी चळवळीमुळे देशाला दररोज सुमारे 3500 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.असोचेमचे सरचिटणीस दीपक सूद म्हणाले की, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात  मोठे नुकसान होत आहे .समावेश आहेपंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती आणि फलोत्पादनावर आधारित असली तरी अन्न प्रक्रिया,, वाहन, शेती यंत्रणा, आयटी ही त्यांची जीवनरेखा बनली आहे.

याशिवाय पर्यटन, व्यापार, वाहतूक आणि आतिथ्य यासारख्या दोलायमान सेवा क्षेत्रांनी या प्रदेशांची मजबुती वाढविली आहे.मात्र सध्या सुरू असलेल्या शेतकर्‍यांचे आंदोलन आणि रस्ते, टोल प्लाझा आणि रेल्वे नाकाबंदीमुळे आर्थिक कामे ठप्प झाली आहेत.

खंडेलवाल म्हणाले, कृषी कायदा हा शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांच्याही हिताचा आहे. मात्र या आंदोलनामुळे देशातील व्यापारी वर्गाला आतापर्यंत एक लाख कोटीचे नुकसान सहन करावे लागले. आंदोलन अधिक काळ चालले तर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एकटय़ा दिल्लीतून इतर राज्यात मोठय़ा प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तूंशिवाय उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. मात्र या आंदोलनामुळे ३० हजार कोटींचा माल  दिल्लीत अडकून पडला आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसोबतच अनेक प्रकारचे अनुदान  मिळत असते. तसेच केंद्र सरकारकडून उद्योजकांनाही वेळोवेळी मोठी मदत केली जाते.देशातील सव्वा कोटी व्यापारी सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत लढत आहेत.

या दोन्ही कंपन्या देशातील नागरिकांना लुटत आहेत. या संदर्भात आम्ही न्यायालयात लढा देत असून त्यासाठी एक समिती देखील गठित करण्यात आल्याचे  खंडेलवाल यांनी सांगितले.

One lakh crore loss to trade and industry due to farmers agitation Agricultural law is in the interest of farmers

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*