थोरात – नानांची शिष्टाई कामी आली; काँग्रेसला कात्रज घाट दाखविण्याची संधी गेली!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय पक्षाच्या आदेशानुसार माघार घेणार आहेत.Thorat – Nana’s etiquette worked; Congress has a chance to show Katraj Ghat !!

या सगळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई कामी आली आहे. पण या निमित्ताने महाविकास आघाडीत गद्दारी करून काँग्रेसला धडा शिकवण्याची मात्र संधी गेली आहे!!नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उमेदवारावरून नाराजी असल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. रजनी पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत होतेच. परंतु ती नियुक्ती गेले आठ महिने रखडल्याने अखेर काँग्रेस नेत्यांनी रजनी पाटलांना राज्यसभेची उमेदवारी दिली. परंतु हेच नेमके शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकले.

आधीच विधानसभेचे अध्यक्षपद सोडून नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले. नंतर रजनी पाटलांना १२ आमदारांच्या यादीतून काढून राज्यसभेचे उमेदवार केले. त्यामुळे महाविकास आघाडीला आमदारांच्या शक्ती प्रदर्शनाच्या संख्याबळाला सामोरे जायला काँग्रेस भाग पाडत होती. याचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना राग येत होता. त्यातून राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला धडा शिकवण्याचे मनसुबे रचले जात होते.

भाजपला विधानसभा संख्याबळाच्या दृष्टीने 20 आमदार कमी पडत होते हे सर्व लक्षात घेऊन नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांना राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या परंपरेनुसार बिनविरोध करण्याची विनंती केली होती.

ती अखेर भाजपने मानली आहे. त्यामुळे नाना आणि बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई अखेर कामी आली. पण काँग्रेसच्या उमेदवाराला धडा शिकवण्याची राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची संधी मात्र हिरावली गेली आहे.

Thorat – Nana’s etiquette worked; Congress has a chance to show Katraj Ghat !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती