विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मागच्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मांडेगावच्या चांदणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडले. तो चक्क पुराच्या पाण्यातून वाहून गेला आहे.Stunts on river bridge in solapur ; The flood swept away the young boy
चांदणी नदीच्या पुलावर कांही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत असताना एक तरुण पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेला. पांडुरंग कदम,असे त्या तरुणाचे नाव आहे.
नशीब बलवत्तर म्हणून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m7ePCNA2PnA&feature=youtu.be
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App