सोलापुरात दहा दिवसांत ६१३ मुले कोरोनाबाधित दुसऱ्या लाटेतच कोरोनाने मुलांना गाठले


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत ६१३ मुले करोनाबाधित झाली आहेत. तिसऱ्या लाटेचा मुलांना धोका असल्याचे सांगितले जात असताना दुसऱ्या लाटेत मुलांना कोरोना झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.In ten days in Solapur 613 children infected with coronavirus

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण प्रकर्षांने दिसू लागले आहे. जिल्ह्य़ात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १८ वर्षांखालील सुमारे १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली. मात्र यामध्ये अलिकडे वाढ होत आहे. यात अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल ६१३ मुले कोरोना बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.



जिल्हा ग्रामीणमध्ये विशेषत: बाधितांचे प्रमाण मोठे आहे. मात्र या वयोगटातील लसीकरण झाले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत असले, तरी या मुलांमध्ये कोरोनाची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

शहर व जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षांत बाधित मुलांमध्ये सर्वाधिक ११ हजार ८८६ मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात ६७७३ मुले तर ५११३ मुलींचा समावेश आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला.

दहा लाख मुलांची तपासणी

जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १८ वर्षांखालील सुमारे १० लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली. ६० पेक्षा अधिक मुले कोरोनाबाधित होती. याशिवाय सुमारे पाचशे मुलांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळून आली.

  • सोलापुरमध्ये दहा दिवसांत ६१३ मुलांना कोरोना
  • दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे
  • १८ वर्षांखालील १२ हजार मुलांना कोरोनाची बाधा
  • विशेषत: ग्रामीण भागामध्ये बाधितांचे प्रमाण मोठे
  •  लसीकरण नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत आहे

In ten days in Solapur 613 children infected with coronavirus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात