राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नानांना आठवली फडणवीसांची मैत्री…!!

प्रतिनिधी

नागपूर : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना दगाफटका होईल या भीतीने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेणाऱ्या नाना पटोले यांना फडणवीसांची आज मैत्री आठवली आहे.Nana Patrole says Devendra Fadanavis is his long times friend

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात काही गैर आहे? आम्ही दोघेही मित्र आहोत हे आम्ही जगजाहीर सांगतो. मग मित्राला मिठी मारायची नाही तर काय शत्रूला मिठी मारायची?, असा खोचक सवाल त्यांनी केला.आपल्या खोचक सवालातून नेमका काय राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते म्हणाले की कृपया माझ्या विधानाचा राजकीय अर्थ काढू नका. काँग्रेस आणि भाजप यांची राजकीय विचारसरणी कधीही एक होऊ शकत नाही. मात्र देश हितासाठी आम्ही काही मुद्द्यांवर एकत्र येऊ शकतो, असे नानांनी सांगितले.

यावेळी नानांनी राज्यसभा निवडणूक बिनविरोध करणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेविषयी देखील भाष्य केले. ते म्हणाले, की एखाद्या विद्यमान खासदार यांचे निधन झाले असेल तर त्या खासदारांच्या जागी संबंधित पक्षाच्याच नेत्याला उमेदवारी देऊन बिनविरोध निवडून आणण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.

त्यानुसार राजीव सातव यांच्या जागी काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना महाराष्ट्रातले सगळ्या पक्षांचे आमदार बिनविरोध निवडून देतील अशी मला आशा वाटते. तशी विनंती करण्यासाठीच मी आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काल देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो होतो. यापेक्षा त्याचा वेगळा राजकीय अर्थ काहीही नाही, असा दावाही त्यांनी केला.

Nana Patrole says Devendra Fadanavis is his long times friend

महत्त्वाच्या बातम्या