पवारांनी केली की “पॉवरफुल खेळी” आणि काँग्रेस नेत्यांच्या फडणवीसांशी भेटी “लोटांगण”…??


महाराष्ट्रातली राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटले. त्यावर मराठी माध्यमांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नाराजीच्या बातम्या देताना काँग्रेसचे देवेंद्र फडणवीसांपुढे लोटांगण असे वर्णन केले. काँग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे घरी भेटायला गेले हे खरेच. पण ते का गेले?, हे त्यांनी उघडपणे सांगितले. Pawar said that “Powerful game” and meetings of Congress leaders with Fadnavis “Lotangan” … ??

काँग्रेसच्या नेत्यांना शिवसेना आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसकडून दगाफटका होण्याची भीती वाटते. हा दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसचे नेते फडणवीसांना भेटले. ही भेट म्हणजे “लोटांगण” असेल, तर मग शरद पवार हे सहकारी बँकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह – सहकार मंत्री अमित शहा यांना भेटले तर ती “पॉवरफूल खेळी” हा मराठी माध्यमांचा विशेषत: “पवार आश्रित” मराठी माध्यमांचा दुटप्पीपणा आहे…!!

पवारांनी आत्तापर्यंत सहकारी साखर कारखान्यांच्या मदतीसाठी, ऊस उत्पादकांच्या मदतीसाठी, बिल्डर आणि विकासकांच्या मदतीसाठी, सहकार क्षेत्राच्या मदतीसाठी पंतप्रधान आणि सहकार मंत्र्यांना जी पत्रे लिहिली ते काय होते?? सहकारी बँकांचे घोटाळे हे महाराष्ट्राला सर्वज्ञात नाहीत काय? त्याची चौकशी टाळण्यासाठी पवार पंतप्रधानांना आणि सहकार मंत्र्यांना भेटतात हे काही गुपित आहे का?? पण त्यांनी केली, तर ती “पॉवरफुल खेळी” आणि काँग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले तर ते “लोटांगण” आणि त्यावर मराठी माध्यमांची मखलाशी काय?, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे नाराज आहेत…!!

काँग्रेस धुतल्या तांदळासारखी नाही. भाजपही नाही. मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काय धुतले बासमती तांदूळ आहेत काय…?? त्यांच्या दगाफटकाच्या भीतीनेच तर काँग्रेसचे नेते फडणवीसांना भेटले. त्यांनी उघडपणे तो प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचा निकाल काय लागायचा तो लागो. पण काँग्रेस नेत्यांनी फडणवीसांकडे जाणे हे “लोटांगण” घातले हे मराठी माध्यमांचे म्हणणे जर खरे मानायचे असेल तर मग पवारांच्या प्रत्येक राजकीय हालचालीला “पॉवरफुल खेळी” म्हणणाऱ्या या माध्यमांना दांभिक नाही तर दुसरे काय म्हणायचे…??



पवारांची 6 जनपथ मधली सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची बैठक फसली. ही बैठक आपण बोलवलीच नसल्याचा खुलासा करण्याची वेळ पवारांवर आली. ही बैठक राष्ट्र मंचाच्या यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती असे म्हणावे लागले. पण त्यावेळी मराठी माध्यमे काय म्हणाली?? जरा आठवून पहा. पवार आता जणू काही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय तयार करून आज किंवा उद्या शपथ घेतात की काय…!! असे वातावरण मराठी माध्यमांनी तयार केले होते. ते वातावरण तयार झाले नाहीच, उलट पवारांना दिल्लीत काँग्रेसचे नेते काडीचीही किंमत देत नाहीत हे सिद्ध झाले. पण ते मराठी माध्यमांनी छापले नाही.

पवारांच्या “पॉवर खेळी”च्या मराठी माध्यमे एवढी प्रेमात पडली आहेत की पवारांनी डावीकडे किंवा उजवीकडे बघितले तरी त्यांना त्यात “पॉवरफुल खेळी” दिसते आणि काँग्रेस नेत्यांच्या फडणवीसांच्या साध्या भेटीमध्ये देखील “लोटांगणे” दिसतात. वास्तविक हे काँग्रेस नेत्यांचे फडणवीसांपुढे लोटांगण नाही, तर मराठी माध्यमांचे पवारांपुढे खरे लोटांगण आहे आणि ते पॅकेजच्या लाचारीतून आले आहे…!!

Pawar said that “Powerful game” and meetings of Congress leaders with Fadnavis “Lotangan” … ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात