शरद पवारांचे बेछूट आरोप थांबवा, उलट त्यांच्याकडूनच कसे वागायचे ते शिका; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षांकडून किरीट सोमय्यांवर टीकास्त्र

प्रतिनिधी

नगर – भाजपचे नेते सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच मुश्रीफ समर्थकांकडून विरोध होत आहे. सोमय्या यांनी अहमदनगर जिल्ह्यात येऊनही सरकार आणि त्यातील नेत्यांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील सोमय्या यांच्याविरूद्ध प्रथमच प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा ऍड. शारदा लगड यांनी सोमय्या यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. NCP women wing targets kirit somaya over his alligations against sharad pawar


किरीट सोमय्यांचा आता २८ सप्टेंबरला कोल्हापूर – कागल दौरा; हसन मुश्रीफांविरूध्द करणार पोलीसांत तक्रार


 

ऍड. लगड यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोमय्या यांनी आमचे नेते खासदार शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप सुरू केले आहेत. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची बदनामी केली आहे. ज्या लोकांना सवंग प्रसिद्धीची सवय झाली आहे, ते असे बेछुट आरोप करतात. सोमय्या यांनी उगाच हवेत गोळीबार करू नये.

अनेक रथीमहारथींनी शरद पवार यांच्या आरोप केले होते, परंतु त्यांचा एकही आरोप त्यांना शाबीत करता आला. उलट तुम्ही आमचे नेते शरद पवार यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वागले पाहिजे हे शिकून घ्या, असा सल्लाही लगड यांनी सोमय्या यांना दिला आहे.

NCP women wing targets kirit somaya over his alligations against sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या