Captain Amarinder Singh Hits Back on Congress Remarks Says There is no place for anger in Congress, but humiliation

‘काँग्रेसमध्ये संतापाला जागा नाही, पण अपमानाला आहे’, काँग्रेसच्या प्रतिक्रियेवर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पलटवार

Captain Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सातत्याने काँग्रेसवर आगपाखड करताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते म्हणाले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अनुभवशून्य आहेत. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव करण्याची शपथ घेतली आहे. दुसरीकडे, अमरिंदर सिंग यांच्या या हल्ल्यावर काँग्रेसने गुरुवारी म्हटले की, वडीलधाऱ्यांना राग येणे स्वाभाविक आहे, पण त्यांनी राजकारणात रागाला स्थान नसल्याची आठवण करून दिली. Captain Amarinder Singh Hits Back on Congress Remarks Says There is no place for anger in Congress, but humiliation


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग सातत्याने काँग्रेसवर आगपाखड करताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी ते म्हणाले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी अनुभवशून्य आहेत. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचा पराभव करण्याची शपथ घेतली आहे. दुसरीकडे, अमरिंदर सिंग यांच्या या हल्ल्यावर काँग्रेसने गुरुवारी म्हटले की, वडीलधाऱ्यांना राग येणे स्वाभाविक आहे, पण त्यांनी राजकारणात रागाला स्थान नसल्याची आठवण करून दिली.

तथापि, काँग्रेसच्या या प्रतिक्रियेमुळे अमरिंदर सिंग आणखी संतप्पत झाले आहेत. आता अमरिंदर सिंग यांनी सवाल केलाय की, काँग्रेससारख्या ‘मोठ्या जुन्या पक्षात’ अपमानाला जागा आहे का? काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी सिंग यांच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर देताना एआयसीसीच्या ब्रीफिंगमध्ये पत्रकारांना सांगितले की, “ते बहुधा माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. वडीलधाऱ्यांना राग येतो, खूप राग येतो, कधी-कधी रागात येऊन ते काही बोलून जातात. पण आपण सर्व त्यांच्या राग, वय आणि त्यांच्या अनुभवांचा सन्मान करतो. मला वाटते ते नक्कीच यावर पुनर्विचार करतील.”

वैयक्तिक टिप्पण्यांसाठी जागा नाही

पण, त्या पुढे म्हणाल्या, “राग, मत्सर या वैयक्तिक टिप्पण्यांना स्थान नाही. राजकारणात सूडाला स्थान नाही. आम्हाला आशा आहे की, ते समजूदारपणा दाखवतील. ते काँग्रेस पक्षाचे एक मजबूत योद्धा असल्याने त्यांनी जे म्हटले आहे त्याचा पुनर्विचार करतील. असे शेरे त्यांच्या उंचीला शोभत नाहीत.” दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीनेट म्हणाल्या की, लोक राजकारणात निर्णय घेतात, काही स्वतःसाठी, काही स्वतःच्या हितासाठी तर काही आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी.”

ज्येष्ठ नेत्यांना अन्यायकारक वागणूक

श्रीनेट यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचे माजी मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी सिंग यांच्या हवाल्याने एक उद्धरण ट्विट केले, “होय, राजकारणात रागाला स्थान नाही. पण काँग्रेससारख्या भव्य जुन्या पक्षात अनादर आणि अपमानासाठी जागा आहे का? जर माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जाऊ शकते, तर मला आश्चर्य वाटते की, कार्यकर्ते काय करतील!”

Captain Amarinder Singh Hits Back on Congress Remarks Says There is no place for anger in Congress, but humiliation

महत्त्वाच्या बातम्या