सुरक्षा समितीचा विस्तार करण्याची भारतासह अन्य चार देशांची मागणी

नवी दिल्ली – भारताने ब्राझील, जर्मनी आणि जपान समवेत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्तारासाठीची आग्रही मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे काल भारत, जपान, जर्मनी आणि ब्राझील या जी-४ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होऊनसंयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीच्या विस्ताराची मागणी करणारे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. India demand for UNCC reforms

दरम्यान, आमसभेतील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्याबाबत बोलणार असून यादरम्यान भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठीची दावेदारी देखील मांडली जाणार आहे.मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी याबाबतचे संकेत दिले होते.भारतासोबतच जपान, जर्मनी आणि ब्राझील या देशांचीही सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाची मागणी आहे. सद्यःस्थितीत या सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्य असलेल्या भारताकडे अध्यक्षपद आहे. तर अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन हे पाच स्थायी सदस्य आहेत.

India demand for UNCC reforms

महत्त्वाच्या बातम्या