‘ देवगिरी किल्ला’, ‘अजिंठा- वेरूळ’ येथील लेणी पाहून सुप्रिया सुळे हरखल्या; ‘चिरोट्या’ची चवही रेंगाळली जिभेवर


वृत्तसंस्था

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. त्यांनी ‘देवगिरी किल्ला’, अजिंठा- वेरूळ येथील लेणी पाहण्याचा आनंद सहकुटुंब घेतला. विशेष म्हणजे त्यांनी या दौऱ्यात या परिसरात प्रसिद्ध असलेल्या ‘चिरोट्या’ चा सुद्धा आस्वाद घेतला. आता कोरोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळे सरकारने खुली केली आहेत. Supriya Sule visited Devagiri Fort, Ajanta-Verul ; The taste of ‘Chirotya’ lingered on the tongue

‘देवगिरी किल्ला’ हा किल्ला यादवांनी ११ व्या शतकात बांधला होता. दिल्लीचा सुलतान आल्लाउद्दीन खिलजीने हल्ला चढवून तो कपटाने ताब्यात घेतला होता. त्यानंतर त्याचे नामकरण ‘दौलताबाद’ असे केले गेले. अभेद्य आणि वैभवशाली परंपरेची साक्ष देणारा हा एक किल्ला मानला जातो. राज्यातील अतिशय सूबत्ता आणि वैभवशाली राजवट असलेल्या देवगरीवर आक्रमण करून मुस्लिम शासकांनी स्वर्गाचा नरक केला.

हिंदूवर प्रचंड अत्याचार केले. आया- बहिणींची अब्रू लुटली. हा देवगिरीचा इतिहास आहे. दुर्गात दुर्ग बेलाख रायगड आहे. पण, इंद्राची जणू अलंकापुरी, अशी ख्याती असलेल्या देवगिरी किल्ला उत्तम स्थापत्य कलेचा आणि सुरक्षेसाठी अभेद्य मानाला जातो. या किल्ल्याचा दौरा आणि अजिंठा आणि वेरूळ येथील लेणीची पाहणी सुप्रिया सुळे यांनी केली.



किल्ला, कैलास मंदिर पाहून सुप्रिया सुळे हरकल्या

‘अधिक कळस मग पाया’ असे ज्याचे वर्णन केले जाते ते कैलास मंदिर पाहून तर त्या हरखून गेल्या. एवढे मोठे मंदिर एक विशाल दगड कोरून कसे काय बनविले, याचे आश्चर्य आजही पर्यटकांना वाटते. लेण्यांचे तर कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

आता नामकरणाची हिम्मत दाखविणार का ?

या परिसराची ओळख असलेला खाद्यपदार्थ म्हणजे ‘चोरोटे ‘यांचा आस्वाद सुळे यांनी घेतला. आपण दिवाळीला नाही का बनवत ‘चिरोटे’ अहो तेच ते. त्याला या परिसरात ‘खाजा’, असे म्हणतात. ते येथे जागोजागी मिळतात. देवगरीला दौलताबाद आणि चिरोट्याचे खाजा असे संबोधले जाते. नावात बदल केल्यामुळे त्याची खरी ओळख पुसली गेली आहे. राज्यात शिवरायांचा विचारांचा वारसा चालविणारे सरकार आहे, असे म्हणतात. महाराजांनी आपल्या राज व्यवहार कोषातून परकीय शब्द काढून टाकले होते. शुद्ध मराठी शब्द वापरले होते. किमान आता औरंगाबादचा नव्हे संभाजीनगरचा इतिहास पाहता दौलताबादचे देवगिरी, आणि खजाचे चिरोटे, असे नामकरण करण्याची हिम्मत सरकार दाखवणार का ? , असा प्रश्न जनतेला पडला आहे. सारा इतिहास तुमच्या समोरच आहे.

Supriya Sule visited Devagiri Fort, Ajanta-Verul ; The taste of ‘Chirotya’ lingered on the tongue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात