राज्य सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसल ; गोपीचंद पडळकरांची राज्य सरकारवर टीका


मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल करण्यात आली आहे.दरम्यान २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांना नियुक्तीसाठी झुरावं लागतंय The state government has wiped out the mouths of many students; Gopichand Padalkar criticizes the state government


विशेष प्रतिनिधी

मागील काही दिवसांपूर्वी आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलनात उतलरे होते. यातून बाहेर पडल्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे.यावेळी दरम्यान पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.महाविकास आघाडी सरकार गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांवर काय भूमिका घेणार हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.



आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच करण्यात आले होते. फक्त तोंडाची वाफ केली. विधान सभेत मोठ्या- मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल करण्यात आली आहे.दरम्यान २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदावारांना नियुक्तीसाठी झुरावं लागतंय.

चार महिने उलटून गेले तरी अजून लोकसेवा आयोगावर सदस्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन आहे. २०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळं अजूनही नियुक्तीसाठी झुरावं लागतंय, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

वयोमर्यादा वाढवण्याची फक्त घोषणाच

कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं, त्यावर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र कुठलीही अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला या प्रस्थापितांनी फक्त पानं पुसली असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि आरोग्य विभागाच्या भरतीतील गैरप्रकारावरुन ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेतलीय.

The state government has wiped out the mouths of many students; Gopichand Padalkar criticizes the state government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात