काल सायंकाळी 7.30 वाजता शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या त्यांना भेटू शकल्या नाहीत. आज ममता बॅनर्जी दुपारी ३ वाजता शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेणार आहेत. मात्र, या संपूर्ण तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या काँग्रेसच्या एकाही नेत्याला भेटणार नाहीत. यावर प्रश्न उपस्थित केला असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसचे नेते तर दिल्लीत आहेत, महाराष्ट्रात कुठे? Mamata Banerjee did not meet Any Congress leaders in Maharashtra, Sanjay Raut said, Congress Leaders Are in Delhi, Not in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातून दौऱ्याची सुरुवात केली. काल सायंकाळी 7.30 वाजता शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची त्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या त्यांना भेटू शकल्या नाहीत. आज ममता बॅनर्जी दुपारी ३ वाजता शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेणार आहेत. मात्र, या संपूर्ण तीन दिवसांच्या दौऱ्यात त्या काँग्रेसच्या एकाही नेत्याला भेटणार नाहीत. यावर प्रश्न उपस्थित केला असता संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसचे नेते तर दिल्लीत आहेत, महाराष्ट्रात कुठे?
राऊत म्हणाले की, शरद पवार हे विरोधी पक्षातील सर्वात मोठे नेते, सर्वात अनुभवी नेते आहेत. ममता दीदी या बंगालच्या शेरनी आहेत. त्यांची पवारांशी भेट अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घ्यायची होती. पण मुख्यमंत्र्यांची तब्येत पाहून त्यांनीच त्यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. कारण केंद्र सरकारकडून केंद्रीय एजन्सींचा गैरवापर करून भाजपेतर सरकारच्या कामात अडथळे आणले जात आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या लढाईची तयारी करणे आवश्यक आहे. त्या लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळेच ममता दीदींनी मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे बरे होईपर्यंत विश्रांती घेण्यास सांगितले. त्यांच्या वतीने त्यांचा मुलगा मंत्री आदित्य ठाकरे आणि मी भेटलो.
यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले की, ममता बॅनर्जी काँग्रेसला जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत का? त्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना भेटतायत, पण काँग्रेसच्या नेत्यांना का भेटत नाहीत? त्यावर संजय राऊत म्हणाले, ‘इथे काँग्रेसचे नेते कुठे आहेत? काँग्रेसचे नेते दिल्लीत बसतात. आणि जेव्हा ममता दीदी दिल्लीत होत्या, तेव्हा त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर बोलल्या होत्या.
मुंबईत येण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली, सोनिया गांधींची भेट घेतली नाही. राहुल गांधींनी बोलावलेल्या विविध पक्षांच्या बैठकीला त्या गेल्या नाहीत. यावरून ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील दुरावा पुन्हा पुन्हा समोर येतोय. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भेट न घेतल्यावरून संजय राऊत यांनीही आता नवे वक्तव्य केल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App