लाखो पूरग्रस्तांच्या व्यथा – वेदना राहिल्या बाजूला; मुख्यमंत्र्यांच्या टाळीखेचक वक्तव्यांनाच मराठी माध्यमांची प्रसिद्धी


ठाकरे – फडणवीस भेट गाजविण्यात मानतात धन्यता


प्रतिनिधी

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्राच्या पूरग्रस्त दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या समोर आले काय, तर त्याच्याच बातम्या मराठी आणि अन्य प्रसारमाध्यमांनी गाजवायला सुरुवात केली. यामध्ये लाखो पूरग्रस्तांच्या व्यथा आणि वेदना बाजूलाच राहिल्या.The plight of millions of flood victims – the pain remains; Publicity of Marathi media only for the applause of the Chief Minister

त्यांच्या जगण्याचे प्रश्न सत्ताधाऱ्यांचा समोर आणि विरोधकांसमोर देखील मांडण्याचे काम माध्यमांनी केलेच नाही.उलट उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर राजकीय कुरघोडी कशी केली याचे चर्वण करण्यात माध्यमांनी धन्यता मानलेली दिसली.दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीत केली. त्याच्यावर थोडक्या चर्चेत काही सांगता येणार नाही परंतु उपाययोजना करावी लागेल हे खरे आहे एवढेच उद्धव ठाकरे भेटीच्या ठिकाणी म्हणजे शाहूपुरीत म्हणाले.

थोड्या वेळाच्या भेटीनंतर दोन्ही नेते आपआपल्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपण पॅकेज देणारा मुख्यमंत्री नसून मदत करणाऱ्या मुख्यमंत्री आहोत, असे विधान केले.

हा टोला त्यांनी फडणवीसांना लावल्याचे प्रसारमाध्यमांनी परस्पर ठरवून टाकले आणि त्यालाच मराठी माध्यमांनी जोरदार प्रसिद्धी दिली. जणू काही मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीस हे एकमेकांवर टोलेबाजी करायलाच पूरग्रस्त दौर्यावर आले असल्याचे चित्र माध्यमांनी यातून निर्माण केले.

पूरग्रस्तांसाठी रेषेलगत भिंती बांधण्याची योजना असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याला मात्र मराठी माध्यमांनी दुय्यम प्रसिद्धी दिली. याखेरीज जी गंभीर चर्चा आणि व्यथा-वेदना पूरग्रस्तांना मांडल्या त्यांच्याकडेही मराठी माध्यमांनी पुरेसे लक्ष दिल्याचे दिसले नाही.

The plight of millions of flood victims – the pain remains; Publicity of Marathi media only for the applause of the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”