मुंबईतील २६/११ च्या हल्याविरोधातील मोहीमेचे प्रमुख जे. के. दत्ता यांचे निधन

मुंबईमध्ये २००८ साली २६/११ रोजी झालेल्या हल्याविरोधातील मोहीमेचे नेतृत्व केलेले नॅशनल सिक्योरिटी गार्डचे माजी प्रमुखअधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुडगावमध्ये निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते.The head of the campaign against the 26/11 attacks in Mumbai, J. K. Datta passed away


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईमध्ये २००८ साली २६/११ रोजी झालेल्या हल्याविरोधातील मोहीमेचे नेतृत्व केलेले नॅशनल सिक्योरिटी गार्डचे माजी प्रमुखअधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुडगावमध्ये निधन झाले आहे. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते.

. दत्त आॅगस्ट 2006 ते फेब्रुवारी 2009 पर्यंत एनएसजीचे प्रमुख होते. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईमध्ये झालेल्या दहशतावादी हल्याविरोधात लढा देण्यासाठी आॅपरेशन ब्लॅक टॉरनेडो चालवण्यात आले होते.पाकिस्तानमधील सशस्त्र अतिरेक्यांनी ताज पॅलेस आणि दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी 100 वर्ष जुन्या ताज हॉटेलमध्ये अनेकांना बंधक बनवले होते.

ठरॠ यांना बंधकांना सोडवणे आणि हॉटेलला दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याची जबाबदारी एनएसजीकडे देण्यात आली होती.2007 मध्ये वेस्टइंडीजमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान भारतीय क्रिकेट टीमला एनएसजी कमांडोची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

कॅरिबियन बेटांवर सुरक्षेच्या पुरेशा व्यवस्था नसल्यामुळे भारत सरकारने हा निर्णय घेतला. त्यानंतर एनएसजी कमांडो वेस्ट इंडिजमध्ये पाठवण्यात आले. तेव्हा ज्योती कृष्ण दत्त एनएसजीचे महासंचालक होते.

The head of the campaign against the 26/11 attacks in Mumbai, J. K. Datta passed away

महत्वाच्या बातम्या