महाराष्ट्रातील लॉकडाऊन लागण्याच्या धास्तीने मजुरांची मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तोबा गर्दी

वृत्तसंस्था

मुंबई : परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनच्या धास्तीने पुन्हा गावाकडं परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईत मंगळवारी कुर्ला रेल्वे स्थानकावर मजुरांची प्रचंड गर्दी होती. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊन लावणार हे निश्चित झालं आहे.Fear of lockdown in Maharashtra Toba crowd of workers at the railway station in Mumbai

त्याची औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र परराज्यातील मजुरांनी या लॉकडाऊनमुळे पुन्हा मूळ गावाकडं परतण्यास सुरुवात केली.राज्यात बुधवारी रात्रीपासूनच पुन्हा कडक लॉकडाऊनची शक्यता आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये हाल होऊ नयेत, यासाठी मजुरांनी गावचा रस्ता धरला आहे.यात नेहमीच्या रेल्वेंबरोबरच काही स्पेशल ट्रेनहीआज रवाना केल्या जात आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर मजुरांची गर्दी होती.कुर्ला स्टेशनवरून मंगळवारी एकूण 23 रेल्वे रवाना होणार आहे. त्यामुळं यातून प्रवास करणाऱ्या मजूर, कामगार यांची गर्दी कुर्ला स्टेशनबाहेर होती.

उन्हाळी गाड्यांमुळे गर्दी वाढल्याचा दावा

मध्य रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी मात्र उन्हाळ्यातील विशेष रेल्वे आणि दैनंदिन गाड्यांमधीलच हे सर्व प्रवासी असल्याचं सांगितलं. उन्हाळ्यात गावी जाणाऱ्यांची गर्दी आहे असं ते म्हणाले.

ज्या प्रवाशांचे कन्फर्म बुकींग असेल त्यालाच प्रवासाची परवानगी आहे. तसंच गर्दीमुळे सहा स्थानकांवरील तिकिट काऊंटर बंद केली आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तही तैनात आहे.

Fear of lockdown in Maharashtra Toba crowd of workers at the railway station in Mumbai