विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याची ओळख आणि एकेकाळी देशाची राजधानी असलेल्या पुण्यातील शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास पाहण्याची संधी या निमिताने पर्यटकांना पुन्हा मिळत आहे.the good news:Shanivar Wada finally open to tourists; Opportunity to see the glorious history of the Marathi Empire
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाडा बंद ठेवला होता. तो खुला करावा, या मागणीसाठी आंदोलनही झाले होते.कोरोनाचा प्रसार कमी झाला तसा शनिवारवाडा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. शनिवार वाडा पाहण्यासाठी राज्य आणि देशातून पर्यटक येतात. मास्क, सॅनिटीझर वापरणाऱ्या लोकांना प्रवेश दिला जात आहे.
शनिवारड्याला आहे मोठा इतिहास
श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हा शनिवार वाडा बांधला. मराठी सत्तेच्या ताकदीचा दरारा अखंड हिंदुस्थानात दाखविण्याची वाट याच वाड्यातून गेली होती. तसेच बाजीराव- मस्तानी यांची प्रेम कहाणी या वाड्याने पहिली आणि ऐकली सुद्धा आहे.
अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दालीला धूळ चारायला याच शनिवार वाड्यातून मराठे वीर हे श्रीमंत सदाशिवभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली पानिपतावर लढायला गेले होते. हिंदुस्थानवर आलेल्या परकीय आक्रमणाला चोख उत्तर देणारे पहिले मराठे वीरच होते. पानिपतावर झालेल्या लढाईनंतर परकीय आक्रमणे अनेक शतके पुन्हा झाली नाहीत, हाच खरा इतिहास आहे.
त्यापूर्वी अटकेवर भगवा झेंडा रोवणारे श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी सुद्धा याच वाड्यातून उत्तरेकडे कूच केली होती. देशाची सीमा अटकेचा किल्ला आहे, हे त्यांनी शत्रूला तलवारीचे पाणी पाजून सांगितले होते. वीर आणि पराक्रमाची साक्ष असलेल्या या वाड्यात कटकारस्थाने रचली होती. काका आणि पुतण्याच्या दुहीचा इतिहासही वाड्याने पहिला आहे.
श्रीमंत माधवराव पेशवे आणि श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा संघर्ष. त्यानंतर श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांचा सत्तेचा लोभ आणि त्यातून श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा मकर संक्रातीला गारद्यांनी केलेला खून, असा रक्तरंजित इतिहास या वाड्याला आहे. ‘काका मला वाचवा, काका मला वाचवा’, असा नारायणराव पेशवे यांचा आवाज आजही वाड्यात गुंजतो.
एकंदरीत मराठी साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देणारा हा शनिवार वाडा आहे. भविष्यात हिंदुस्थानच्या रक्षणासाठी कोणी पुढे आले नाहीतर महाराष्ट्र मात्र नक्की पुढे येईल, ‘महाराष्ट्र हा देशाचा खडगहस्त होईल’ याची प्रेरणा हा शनिवार वाडा देत राहणार यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App