WATCH : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची लसीकरण केंद्रावर महिला सरपंचाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोपीविरुद्ध गुन्हा

NCP worker beat woman sarpanch at vaccination center case filed against accused after being VIDEO VIRAL

NCP worker beat woman sarpanch : पुणे जिल्ह्यात एका महिला सरपंचाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने शुक्रवारी लसीकरण केंद्रात महिला सरपंचाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. NCP worker beat woman sarpanch at vaccination center case filed against accused after being VIDEO VIRAL


वृत्तसंस्था

पुणे : पुणे जिल्ह्यात एका महिला सरपंचाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने शुक्रवारी लसीकरण केंद्रात महिला सरपंचाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे प्रकरण पुणे जिल्ह्यातील कदमवाकवस्तीच्या लसीकरण केंद्राचे आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सरपंचाला मारहाणीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुजित काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला सरपंचाचे नाव गौरी गायकवाड असे आहे. या घटनेबाबत सरपंच म्हणाल्या की, जर महिला सरपंच चांगले काम करत असेल तर तिला हिंसक मारहाण होते. गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रवादीचा हा कार्यकर्ता पूर्वीही महिलांना मारहाण करत होता.

चित्रा वाघ आक्रमक

महाराष्ट्र भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, हे खूप धक्कादायक असून चीड आणणारं आहे. यादरम्यान चित्रा वाघ यांनी महिलेच्या मारहाणीचा व्हिडिओ ट्विट करत सवाल केला की, “ज्या पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी महिला अधिकाऱ्यांचा अपमान केला, त्यांना छळाची धमकी दिली आणि महिला सरपंचांना मारहाण केली त्या पक्षाला गृह विभागाने परवाना दिला आहे का?” त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री, हे धक्कादायक आहे आणि हे पाहून, तळपायाची आग मस्तकात जाते.

3 दिवसांपूर्वी फेरीवाल्याचा महिला अधिकाऱ्यावर हल्ला

गेल्या तीन दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ठाणे महानगरपालिकेच्या माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कासारवडवली नाक्यावर बेकायदा फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोटे कापली गेली. या घटनेनंतर आरोपी अमरजीत यादवला पोलिसांनी अटक केली. त्याच वेळी, त्या दरम्यान आरोपींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही बोट कापले होते. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कल्पिता पिंपळेंवर अजूनही उपचार सुरू आहेत.

NCP worker beat woman sarpanch at vaccination center case filed against accused after being VIDEO VIRAL

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात