मोदींची काळजी ते मोदींची शिवसेना; महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची टीका की मोदी ब्रॅण्डिंग?!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीतल्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या नेमकं झालंय तरी काय??, अशी शंका वाटावी, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने बाळासाहेबांसमोर झुकलेले मोदी अशी पोस्टर छापून मोदींचे स्वखर्चाने ब्रँडिंग केले!! त्यात मोदींचे काही बिघडले का??, हा संशोधनाशिवाय निष्कर्ष काढण्याचा विषय आहे. कारण मोदींच्या जंगी सभेनेच त्या ब्रॅण्डिंगला दुजोरा दिला आहे!! पण आता बाळासाहेबांसमोर झुकलेले मोदी दाखविणे कमी पडले, म्हणून की काय महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी आपली टीका मोदी सेंट्रिक ठेवल्याचे दिसले आहे. Supriya sule and sushma andhare criticized Modi, but is target Modi or branding Modi?!

खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी, मला मोदींची फार काळजी वाटते. देशाच्या संसदेपासून ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत सगळीकडे मोदींनाच फिरावे लागते. भाजपकडे दुसऱ्या नेत्यांची फळीच नाही. म्हणून मला मोदींची काळजी वाटते, असे वक्तव्य केले होते. मराठी माध्यमांनी या वक्तव्याचे वर्णन खोचक टीका, टोलेबाजी वगैरे शब्दफुलांनी जरूर केले. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या बाकीच्या नेत्यांना टोले हाणताना मोदींवर टीका केली की मोदींचे स्वखर्चाने ब्रँडिंग केले??, हा सवाल कुणी विचारलाच नाही!!



मोदींचे यश, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचे अपयश

संसद ते ग्रामपंचायत मोदी सगळीकडे फिरतात हे खरेच… पण असे फिरून ते भाजपला जे घवघवीत यश मिळवून देतात, त्या यशाचा अंश भाग तरी राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांना स्वपक्षाच्या उमेदवारांना मिळवून देता आला आहे का??, हा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.

सुषमा अंधारे यांची टीका

एकीकडे सुप्रिया सुळे यांना मोदींची “अशी” काळजी वाटली असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना कशाला म्हणून घेता??, सरळ मोदींची शिवसेना म्हणा ना!!, असा टोला जाहीर सभेतून लगावला आहे. सुषमा अंधारे यांची आक्रमक भाषण शैली वगळता यात राजकीय चातुर्य काय आहे?? जे बाळासाहेबांच्या शिवसेनेला प्रत्यक्षात घडवायचेच आहे, ते उघडपणे एकनाथ शिंदे यांनी आपण मोदींचा माणूस असल्याचे सांगून टाकून स्पष्ट केले आहे. मग त्याच शिंदेंना परत त्याच मुद्द्यावरून डिवडण्याने एकनाथ शिंदे यांची प्रतिमाहानी होईल की ठाकरे गटाच्या खर्चाने मोदींचे ब्रॅण्डिंग होईल??, हे कळायला फार मोठ्या राजकीय अभ्यासाची गरज नाही.

एकनाथ शिंदे यांचे मोदी ब्रॅण्डिंग

एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या नेतृत्वाच्या मर्यादा माहिती आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मोदींच्या मर्जीने मिळाल्याचे वास्तव ते जाणतात आणि आज जेव्हा मोदी ब्रँड फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात भारी ठरला असताना ते जर स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी मोदी ब्रँडचा विशिष्ट उपयोग करून घेत असतील, तर ते त्यांचे राजकीय चातुर्य मानायचे की उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या ब्रँडचे अपयश मानायचे??, हे ज्याने त्याने ठरवण्याची गोष्ट आहे.

सुप्रिया सुळे काय किंवा सुषमा अंधारे काय यांनी भले भाजपच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांना खोचक टोले मारल्याचे मराठी माध्यमांनी म्हटले असेल. प्रत्यक्ष शब्दार्थ लक्षात घेतले तर ते खरेही आहे. पण त्याचे राजकीय अर्थ तसेच आहेत का?? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

 गुजरात मधल्या काँग्रेस अपयशाचा धडा

फार जुनी गोष्ट नाही. गुजरातच्या निवडणुकीत मोदी सेंट्रीक प्रचार ठेवू नका. तो काँग्रेसवर उलटेल, असा सल्ला निवडणूक रणनीतीकारांनी काँग्रेस नेत्यांना दिला होता. पण ती चूक काँग्रेसच्या नेत्यांनी 2017 मध्ये आणि 2022 मध्ये अशी दोनदा केली. त्याचे दुष्परिणाम गुजरातमध्ये काँग्रेसला भोगावे लागले आहेत. हे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना कळत नाही का?? की कळूनही त्यांना वळत नाही??, आणि वळले तरी ते अंमलात आणायचे नाही??, हे खरे प्रश्न आहेत.

Supriya sule and sushma andhare criticized Modi, but is target Modi or branding Modi?!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात