विधानपरिषद निवडणुकीसाठी सुनील शिंदे शिवसेनेचे उमेदवार, आदित्य ठाकरेंसाठी सोडली होती वरळीची जागा


आदित्य ठाकरेंसाठी आपली जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी देऊन माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना इशाराच दिला आहे. sunil shinde candidature for legislative council from shiv sena


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आदित्य ठाकरेंसाठी आपली जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून सुनील शिंदे, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी देऊन माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना इशाराच दिला आहे.

शिवसेनेने सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले नसले तरी शिंदे यांना संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे. हे राम कदम यांच्या दृष्टीकोनातून देखील केले गेले आहे कारण नुकतीच त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये ते काही आरआयटी कार्यकर्त्यांशी शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलताना दिसून आले.

आदित्य ठाकरेंसाठी सोडली जागा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सुनील शिंदे वरळी मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडली होती. त्यानंतर शिंदे संघटनात्मक कामात गुंतले.

कोण आहेत सुनील शिंदे?

सुनील शिंदे 2007 साली मुंबई महापालिकेवर निवडून आले होते. ते बेस्ट समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. 2014 मध्ये त्यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला आणि वरळीतून आमदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत त्यांना ६० हजार ६२५, तर सचिन अहिर यांना ३७६१३ मते मिळाली. 2015 मध्ये त्यांच्याकडे उत्तर अहमदनगरच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. ते ठाकरे घराण्याच्या विश्वासू लोकांपैकी एक मानले जातात.

रामदास कदमांना धक्का!

शिवसेनेने यावेळी रामदास कदम यांना विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांना रामदास कदम यांनीच पुरावे दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कदम यांचा विधान परिषदेतून पत्ता कट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

sunil shinde candidature for legislative council from shiv sena

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात