जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित केले आहे. Students of Zilla Parishad schools can take the exam at home.
विशेष प्रतिनिधी
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीच्या ऑनलाइन शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने नवे ई-लर्निंग ॲप विकसित केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देणे आता शक्य होणार आहे.
तसेच या ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या आठवडाभरात ती ॲप कार्यान्वित होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांबाबतच्या संशोधनांचा अभ्यास करून स्वतः या ॲपची रचना केली.
या ॲपमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारने वर्गनिहाय उपलब्ध करून दिलेला आणि जिल्हा परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाकाळात शिक्षणापासून दुरावण्याची शक्यता असलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App