विजेअभावी नागरिकांचे हाल, कारखाने बंद; संपकरी वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू; राज्य सरकारची कठोर भूमिका


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या संपाचा मोठा फटका बसला असून अनेक छोट्या-मोठ्या गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहतींमधील कारखाने विजेअभावी बंद करावे लागले आहेत. त्यामुळे उत्पादन थांबले असून कामगारांच्या आजच्या दिवसाचा रोजगारही बुडाला आहे. strike of electricity workers; Results in several districts in Maharashtra.

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका शहरी भागालाही बसला असून अनेक ठिकाणी सिग्नल अभावी वाहतूक कोंडी झाली आहे. शहरी औद्योगिक वसाहतींमध्ये कारखाने बंद ठेवावे लागले आहेत.



या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारने कठोर पाऊल उचलत वीज वितरण संपकरी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियम अर्थात मेस्मा कायदा लागू केला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट मुदतीत कामावर परतावे लागेल अन्यथा त्यांच्यावर आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा मार्ग शिंदे – फडणवीस सरकारने मोकळा ठेवला आहे. त्याच वेळी सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांची चर्चा करण्याचा मार्गही खुला ठेवला असून त्या संदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर बैठक सुरू आहे.

strike of electricity workers; Results in several districts in Maharashtra.

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात