Farmers electricity connections : शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक; ऊर्जामंत्री गैरहजर; कामकाज तहकूब!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ऐन उन्हाळा सुरू होताना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत प्रचंड आक्रमक झाले. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकार कोडगेपणाने त्या पाहत राहात आहे आणि वरती शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडते आहे, अशा कठोर शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे काढले. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणे हे ताबडतोब थांबवा, अशी आग्रही मागणी त्यांनी सभागार सदनात केली या मुद्द्यावरून सदनात प्रचंड गदारोळ झाला त्यामुळे सदनाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत सभागृहात हजर नव्हते. ते गैरहजर राहण्याचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कळविले होते. Farmers electricity connections: Fadnavis aggressive in assembly on power cut issue; Energy Minister absent; Working schedule !!

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी निवेदन देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उपस्थित केला.

याला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दिला. वीज प्रश्नावरून आजच सभागृहात चर्चा करावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा वीज प्रश्न हाती घेत विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली यामुळे पहिल्यादा पाच मिनिटासाठी सभागृह तहकूब झाले.

– वीज कापण्यारून सत्ताधारी आमदार नाराज

त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारच वीजतोडणी विरोधात बोलत आहेत. नाराजी व्यक्त करत आहे. त्यामुळे वीज तोडणी संदर्भांत आजच घोषणा करावी अशी मागणी केली. यावेळीही गोंधळ सुरूच असल्याने दुसऱ्यांदा पांढर मिनिटसाठी सभागृह तहकूब केले.

तिसऱ्यांदा सभागृहाचे कामकाज सुरु होताच अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावर चर्चा करण्यात येईल. त्यासाठी सरकारला वेळ देण्यात यावा असे सांगितले. तर, संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या प्रश्नावर सरकारतर्फे चर्चा घडवून आणण्याची तयारी दर्शविली.

– नुसती चर्चा नको घोषणा करा

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह होऊन सुरू दोन आठवडे सुरू झाले. चर्चा कसली करता. याचे श्रेय कोणालाच नको. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. परवा एक आत्महत्या झालाय. आज एक झाली. आत्महत्या होतच आहेत. त्यामुळे चर्चा नको तर घोषणा करा अशी मागणी केली.वीज कनेक्शन तोडणी यावरून सत्ताधारी आमदारही नाराजी आता व्यक्त करत आहे. त्यामुळे आजच घोषणा करावी अशी मागणी केली. यावेळी सत्ताधारी आमदार गोंधळ गळत होते त्यामुळे तिसऱ्यांदा कामकाज तहकूब करण्यात आले.

– अजित पवारांचे आश्वासन वाऱ्यावर

दुपारी 12 वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होताच चर्चा नको निर्णय करा अशी मागणी करत विरोधकांनी वेलमध्ये धाव घेतली. मे पर्यंत वीज कनेक्शन कापणार नाही असे अजित पवार म्हटले होते. शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. मंत्री राऊत यांना सभागृहात बोलवा. वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवा. जर शेतकऱ्यांची बाजू मंडळी नाही तर शेतकरी आम्हाला फिरू देणार नाही. आम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जायचे असा सवाल फडणवीस यांनी केला.

– ऊर्जा मंत्री नितीन राऊत गैरहजर

यावर तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे आज सभागृहात उपस्थित रहाणार नाहीत असे त्यांनी कळविले आहे. त्यामुळे या प्रश्नावर उद्या चर्चा करू असे सांगितले. मात्र, विरोधक आपल्या मुद्यावर ठाम राहिले. यातच गोंधळ वाढत गेल्याने पुन्हा कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Farmers electricity connections : Fadnavis aggressive in assembly on power cut issue; Energy Minister absent; Working schedule !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था