द काश्मीर फाइल्सचा वाद थांबताना दिसत नाहीये. अभिनेते अनुपम खेर यांनी कपिल शर्माला टोला लगावला आहे. जनतेला अर्धे सत्य सांगितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर, कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लवकरच काश्मीर फाइल्स ५० कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई :सोमवारी कपिल शर्माने एका मुलाखतीची क्लिप शेअर करून अनुपम खेर यांचे आभार मानले. कपिलने मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – माझ्यावरील सर्व चुकीचे आरोप साफ केल्याबद्दल पाजी अनुपम खेर तुमचे आभार आणि सत्य जाणून न घेता मला इतके प्रेम देणाऱ्या सर्व मित्रांचे आभार. आनंदी रहा, हसत रहा. कपिलच्या कॅप्शन आणि व्हिडिओमध्ये अनुपम खेर झळकल्यानंतर सर्वांनी क्लीन चिट दिली. पण आता कथेत नवा ट्विस्ट आला आहे. THE KASHMIR FILES: Kapil Sharma’s rejection of ‘The Kashmir Files’ promotion … Anupam Kher told the truth but Kapil denied the half-truth …
अनुपम खेर यांनी कपिल शर्माला सुनावले…
अनुपम खेर यांनी कपिलचे ट्विट रिट्विट करताना लिहिले – प्रिय कपिल. माझी इच्छा आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला असता. अर्धसत्य नाही. संपूर्ण जग साजरा करत आहे, तुम्हीही आज रात्री साजरा क्ररा. प्रेम आणि प्रार्थना नेहमी. आता अनुपम खेर यांच्या या वक्तव्यावरून कपिलने स्वत:ला निर्दोष दाखवण्यासाठी हा खटाटोप केलंय मात्र त्यानेअ अनुपमखेर यांच्या बोलण्यातले अर्धे सत्य जगासमोर ठेवले असल्याचे दिसते. तर काश्मीर फाइल्सच्या प्रमोशनचे सत्य वेगळे होते.
काय म्हणाले अनुपम खेर व्हिडिओत? कपिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतात – खरे सांगायचे तर मला द कपिल शर्मा शोसाठी कॉल आला, पण मी माझ्या मॅनेजरला सांगितले की हा चित्रपट खूप गंभीर आहे, मी त्यात जाऊ शकत नाही. मला माझा मुद्दा इथे मांडायचा आहे. ही गोष्ट २ महिन्यांपूर्वीची आहे. मला सांगितले होते की तुम्ही या. त्यामुळे मला वाटले की मी या शोमध्ये यापूर्वी गेलो आहे आणि हा एक मजेदार शो आहे. फनी शो करणे खूप अवघड आहे.
चित्रपटाने 4 दिवसात 42 कोटी कमावले, लवकरच काश्मीर फाइल्स 50 कोटी क्लबमध्ये दाखल होणार आहे. काश्मीर फाईल्सला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more