एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यनची जास्त काळजी गोपीचंद पडळकर यांची ठाकरे सरकारवर टीका


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र, हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यग्र आहेत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत लगावला.State goverment ministers taking more care of Aryan khan insted of ST employees

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्नांवर राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून जीवन संपवले.‌



अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असे असताना दुसरीकडे मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या मागे आहे, असा आरोप पडळकर यांनी केला.

  • एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानचीच काळजी
  • ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या सुरूच
  • एकाही मंत्र्यांकडून कुटुंबियांचे सांत्वन नाही
  • मंत्री आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत
  • सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या पाठीमागे

State goverment ministers taking more care of Aryan khan insted of ST employees

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात