नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोविरोधात आर्यनची तक्रारच नाही; मुकुल रोहतगींचा युक्तिवाद कितपत परिणामकारक ठरेल?


वृत्तसंस्था

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये कोर्टाच्या बाहेर जबरदस्त “पॉलिटिकल ड्रामा” सुरू असताना प्रत्यक्ष मुंबई हायकोर्टात मात्र आर्यन खान याचे वकील माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी संपूर्णपणे वेगळा पवित्रा घेत संबंधित केस फक्त आर्यन खानच्या जामीन अर्जाभोवतीच फिरवण्याचा प्रयत्न केला आहे.Aryan has no complaints against the Narcotics Control Bureau; How effective will Mukul Rohatgi’s argument be?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आणि समीर वानखेडे यांच्यासारख्या विभागीय संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर कोर्टाच्या बाहेर अक्षरश: भडीमार सुरू असताना हायकोर्टात मात्र मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची कोणत्याही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या अधिकाऱ्याविरुद्ध अजिबात तक्रार नसल्याचा युक्तिवाद केला आहे आहे. या युक्तिवादातून आर्यन खानला फक्त जामीन मिळण्याचा मतलब असलेले असे स्पष्ट होते आहे.आर्यन खानचे आई वडील बॉलिवूडमध्ये फेमस कपल असल्याने या केसला एक ग्लॅमर आले अन्यथा या केसकडे कोणीही ढुंकून बघितले नसते, असे मुकुल रोहतगी म्हणाले. त्याच वेळी या केसवर कोर्टाबाहेरच्या कुठल्याही घटनांचा प्रभाव पडू नये यादृष्टीने त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोणत्याही अधिकाऱ्यांवर आर्यन खानचा आरोप किंवा तक्रार नसल्याचे वारंवार सांगितले. यातूनच आर्यन खानला जामीन मिळण्यासाठी किती वेगळ्या पद्धतीने कोर्टात युक्तिवाद सुरू आहेत हे दिसून येत आहे.

आत्तापर्यंत खालच्या कोर्टात सतीश माने शिंदे या अनुभवी वकिलांनी आर्यन खानची बाजू मांडून देखील त्यांना आर्यन खानला जामीन मिळवून देण्यात यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर भारताचे ॲटर्नी जनरल राहिलेल्या मुकुल रोहतगी यांनी आपले सर्व वकिली कौशल्य पणाला लावले आहे आणि त्यातूनच ही संपूर्ण केस फक्त आर्यन खानच्या जामीन अर्जाभोवतीच फिरावी या हेतूने त्यांनी आजचा युक्तिवाद केला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर आरोप किंवा त्या अधिकाऱ्यांविषयी तक्रारी नसल्याचे त्यांनी मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट केल्याने त्याचा परिणाम उद्याच्या सुनावणीत नेमका काय होतो?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Aryan has no complaints against the Narcotics Control Bureau; How effective will Mukul Rohatgi’s argument be?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था