विशेष प्रतिनिधी
मुंबई: विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत राज्यातील अनेक भागात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही कायम आहे. आज अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, असं अनिल परब म्हणाले. तसंच संप मागे घ्या असं आवाहन परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केलंय. ST strike: Seventh pay commission and 10 year contract may be considered but call off strike – Anil Parabs appeal
कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना परब म्हणाले की, पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, समज गैरसमजाबाबतही चर्चा झाली. जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही.
एसटी कर्मचाऱ्यांचे गाजर आंदोलन, संतप्त एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; पगारवाढ अमान्य
एसटी सुरु करण्यासाठी, सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी, कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कामावर रुजू होण्याचं आवाहन ही केलं.
सतत आर्थिक भार सोसत राहायचं आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची असंही होणार नाही. सरकारला विचार करावाच लागेल. पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न दिलेले काय वाईट आहे. असा विचारही सरकार करु शकतं. कामगारांचं मागणं, त्यांचे हक्क अबाधित ठेवणं हे आमचं कामच आहे. त्यामुळे संप मिटला तर ज्या छोट्या मागण्या त्यांनी केल्या त्यावर नक्की विचार केला जाईल, असं आश्वासन देत असल्याचं परब यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App