MAHARASHTRA GOVERNMENT: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजारांची मदत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता . अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी आता राज्य   सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.कोरोनामुळे   मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे.50 thousand each to the families of the citizens who died due to corona

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाणार आहे.


कोरोना काळात मुख्यमंत्री घरकोंबडे; त्याच्या कडेलोटातून महाराष्ट्राला केंद्राने सावरले; खासदार डॉ. हिना गावित यांचा घणाघात


मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती.

ही मदत नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात जमा केली  जाणार आहे. त्यानुसार ही मदत मिळवण्यासाठी  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

50 thousand each to the families of the citizens who died due to corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण