International Flights: केंद्राचा मोठा निर्णय ! प्रतिबंधित 14 देश वगळता-15 डिसेंबरपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय उड्डाण

  • 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु होणार आहेत.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षी मार्च 2021 पासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते.
  • ‘एअर बबल’द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं नियमित सुरु होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षी मार्च 2021 पासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले होते. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.International flights will start from December 15.

डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून भारत प्रतिबंधित 14 देश वगळता नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे. मात्र या 14 देशांसोबत सध्याची एअर-बबल फ्लाइट व्यवस्था सुरू राहील. ‘एअर बबल करारा’ नुसार संबंधित दोन्ही देशांमध्ये विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणं करता येऊ शकतात.‘एअर बबल’द्वारे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

14 देशांना यातून वगळण्यात आले आहे

ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होणार नाहीत ते देश आहेत-ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, फिनलंड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे.

नवीन कोविड स्ट्रेन तसेच या देशांमधील वाढत्या संसर्गाचे प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने या 14 देशांना वगळे आहे.

International flights will start from December 15.

महत्त्वाच्या बातम्या