चोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा


विशेष प्रतिनिधी

जळगाव : चोपडा येथील एसटी आगाराचे वाहक आर. के. वाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले. एसटी प्रशासनाकडून नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांचे नातेवाईकांचे म्हणणं आहे.ST conductor dies of heart attack in Chopda; Relatives claim to have been shocked by the notice

या घटनेनंतर चोपडा आगारात व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये वाहक आर.के. वाणी यांच्या नातेवाईकांनी व कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. आगार व्यवस्थापक संदेश शिरसागर यांनी वरिष्ठांशी चर्चा करून अनुकंपा तत्त्वावर त्यांचा मुलाला नोकरीत घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.



त्यानंतर आगार व्यवस्थापक यांच्या कँबिनमधून नातेवाईक व कर्मचारी बाहेर पडले. आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, जो पर्यंत एसटीचे विलिनीकरण होत नाही. तो पर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय चोपड्यातील कर्मचाऱ्यांनी घेतला होता. यानंतर वाणी यांना नोटीस बजावल्याने हा धक्का त्यांना सहन झाला नाही.

ST conductor dies of heart attack in Chopda; Relatives claim to have been shocked by the notice

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात