एसटीच्या १७२ कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छामरणाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या १७२ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छामरण देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले. Demand for voluntary death from 172 ST employees to CM; Statement to the Collector

कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यासहित हे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमच्या मनात आत्महत्यासारखे विचार येत आहेत. पण, आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे आपण महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नागरिक म्हणजेच मुख्यमंत्री आहात.त्यामुळे आम्हाला स्वेच्छामरणाला परवानगी द्यावी.

एसटी महामंडळात आम्हाला तुटपुंजे वेतन तसेच इतर मानसिक त्रास होत आहे. आमच्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात. परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने तसे काही करु शकत नाही.वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने स्वेच्छामरणाची परवानगी मागत आहोत. ही स्वेच्छामरणाची परवानगी आम्ही स्वतः कुठल्याही दबावात घेत नाही आहे.

कारण आम्ही आता या मानसिक व सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला वैतागलो आहे. या मागणी करीता आमच्यावर कोणीही दबाव टाकीत नसून स्वेच्छेने सही करत आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी द्यावी व आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातुन मुक्त करावे. व आम्हा कर्मचाऱ्यांना जीवनदान द्यावे, अन्यथा आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा विनंतीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Demand for voluntary death from 172 ST employees to CM; Statement to the Collector

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात