Bullibai App प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक, मुख्य सूत्रधार उत्तराखंडची महिला, प्रसिद्ध मुस्लिम महिलांची बदनामी करण्याचा आरोप

Mumbai 21-year-old Vishal Kumar arrested in BulliBai app case to be presented before Bandra court today by Mumbai Police

BulliBai app : वादग्रस्त ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. विशाल झा याला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतले होते. त्याला काल मुंबईत आणण्यात आले असून चौकशीनंतर त्याला मुंबईतच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाला वांद्रे कोर्टापुढे सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे. Mumbai 21-year-old Vishal Kumar arrested in BulliBai app case to be presented before Bandra court today by Mumbai Police


वृत्तसंस्था

मुंबई : वादग्रस्त ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इंजिनीअरिंगच्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. विशाल झा याला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतले होते. त्याला काल मुंबईत आणण्यात आले असून चौकशीनंतर त्याला मुंबईतच अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाला वांद्रे कोर्टापुढे सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे.

बुल्ली बाई अॅप हे एक ऍप्लिकेशन आहे जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिला पोस्ट केल्या जात होत्या आणि त्यांच्यासाठी बोली लावली जात होती. राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलणाऱ्या मुस्लिम महिलांची मानहानी करत त्यांचा ऑनलाइन लिलाव करण्यात येत होता.

मुख्य सूत्रधार उत्तराखंडची महिला

बुल्लीबाई अॅपप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेली एक महिला आहे. ही महिला उत्तराखंडची असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या विशालची आणि या महिलेची ओळख आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा या प्रकरणातील सहआरोपी असून तो मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही बाब 1 जानेवारी रोजी समोर आली जेव्हा अनेक मुस्लिम महिलांची वादग्रस्त अॅपवर बोली लावल्याचे दिसून आले. गिटहब प्लॅटफॉर्मद्वारे होस्ट केलेल्या अॅपद्वारे त्यां महिलांचे फोटो वापरले गेले.

प्रतिष्ठित मुस्लिम महिला निशाण्यावर

GitHub प्लॅटफॉर्मद्वारे होस्ट केलेल्या अॅपच्या टारगेटवर ज्वलंत राजकीय आणि सामाजिक समस्यांवर स्पष्टपणे बोलणाऱ्या महिलांचा समावेश होता. ऍपमध्ये ‘लिलावा’साठी सूचीबद्ध केलेल्यांमध्ये पत्रकार, कार्यकर्ते आणि वकीलदेखील होत्या. हे अॅप ‘सुली डील्स’चे क्लोन असल्याचे मानले जाते, सुल्ली डील्सने मागील वर्षी वापरकर्त्यांना ‘सुली’ ऑफर करून वाद निर्माण केला होता. पोलिसांनी म्हटले आहे की अॅपचा शिखांशी काहीही संबंध नाही, परंतु आरोपीने कथितरीत्या ते खलिस्तानी गटाशी संबंधित असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक राजकीय पक्षांकडून टीका

काँग्रेसचे राहुल गांधी आणि शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, एमआयएमचे ओवैसी, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करून टीका केली. यासोबतच दोषींना अटक करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, अॅपमागील GitHub वापरकर्ता ब्लॉक करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती.

Mumbai 21-year-old Vishal Kumar arrested in BulliBai app case to be presented before Bandra court today by Mumbai Police

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात