नाशिक मध्ये पारा घसरलेलाच; राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद!!


प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मध्ये सलग दुसऱ्या दिवशी बोचर्‍या थंडीने नाशिककरांना हैराण केले आहे. नाशिकमध्ये शहरासह जिल्ह्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रात पारा घसरलेलाच असून नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. WINTER in Nashik; Record low temperature in the state !!

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील बोच-या थंडीला मंगळवारी हलका ब्रेक लागला. सोमवारी थेट 10 अंशाखाली सरकलेला नाशिकचा पारा मंगळवारी 10 अंश सेल्सिअसवर स्थिरावला. राज्यातील किमान तापमानाची नाशिकमध्ये सलग दुस-या दिवशी नोंद झाली. मात्र त्यातुलनेत आता या भागांत किमान आणि कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. संक्रातीच्या दिवशी विदर्भ वगळता राज्यात बोचरी थंडी गायब राहील.

उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे तसेच विदर्भातील गारपीटीच्या प्रभावामुळे राज्यातील मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. तर उत्तर कोकणतील तापमानात सोमवारी लक्षणीय घट नोंदवली गेली. परिणामी कमाल तापमानही खाली घसरले. मंगळवारी मात्र उत्तर कोकणातील कमाल तापमानात 1 ते 2 अंशाने, तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 3 अंशाने वाढ पाहायला मिळाली. सध्या 20 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका राज्यात फारसा दिसणार नाही. तापमान पुढील आठवडाभर सामान्य राहील, अशी माहिती वेधशाळा अधिका-यांनी दिली आहे.

– राज्यातील मंगळवारचे कमाल आणि किमान तापमान

ठिकाण – किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)- कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई (सांताक्रूझ)- १५.६ – २७.३

मुंबई (कुलाबा) – १७.५ – २७

डहाणू – १४.९ – २४.१

अलिबाग – १५.६ – २८

रत्नागिरी – १५.५ – २६.६

नाशिक – १० – २६.३

मालेगाव – १३.६ – तापमान नोंद झाली नाही

पुणे – ११.५ – २७.१

सातारा –१४ – २८.३

सांगली – १४.४ – २९.६

कोल्हापूर – १५- २८

औरंगाबाद – १४.४ – २५.६

बीड – १७.६ – तापमान नोंद झाली नाही

नांदेड – १९ – २७

अकोला – १७.३ – २३.९

अमरावती – १५.८ – तापमान नोंद झाली नाही

बुलडाणा- १४.४ – २२

ब्रह्मपुरी – १७.६ – २२

गोंदिया – १६.४— २०.५

नागपूर- १७.५- तापमान नोंद झाली नाही

वर्धा – १७.४- तापमान नोंद झाली नाही

WINTER in Nashik; Record low temperature in the state !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात