अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट; कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय


विशेष प्रतिनिधी

अमरावती : राज्यस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले ५८ उंट ताब्यात घेतले आहे. Amravati Police 58 camels in possession; Suspicion of smuggling from Rajasthan for slaughter

प्राण्यांना इतकी मोठी चालवत नेणे म्हणजे निर्दयीपणाचा कळस असून त्यांची कत्तलीसाठी तस्करी केली जात आहे, असा आरोप प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी तक्रारीत केला होता. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या ५८ उंटाना चक्क पोलीस संरक्षणात अमरावती येथील संरक्षणात पायदळ नेण्यात येत आहे. या उंटासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



तळेगाव येथून पायदळकडे उंट निघाले असून ते अमरावती येथील दस्तुरनगरच्या गौरक्षणात नेण्यात येत असून हा ५०किलोमीटरचा प्रवास आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत ५८ उंटाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसावर आली आहे.

  • अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट
  •  कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय
  •  हैदराबाद येथील प्राणीमित्राकडून तक्रार
  • राजस्थानातून हैदराबादकडे उंट जात होते
  • अमरावती येथून पायदळ येथे नेण्यात येणार
  •  ५८ उंटाची देखरेख करण्याची जबाबदारी पोलिसावर

Amravati Police 58 camels in possession; Suspicion of smuggling from Rajasthan for slaughter

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात