आजपासून लालपरी रस्त्यावर धावणार, निर्बंधांमुळे एसटीला सात हजार कोटींचा फटका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : एसटी महामंडळाची सार्वजनिक प्रवासी सेवा सोमवारपासून राज्यभरात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. १५ एप्रिलनंतर सर्वसामान्यांसाठी एसटी सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवासी संख्या आणि उत्पन्न घटले.ST begins its service from today

तब्बल १४ कोटींचा दैनंदिन महसूल बुडाला. गेल्या २३ मार्चपासून आतापर्यंत सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या महसुलावर महामंडळाला पाणी सोडावे लागले.


एसटीच्या ‘महाकार्गो’ची वेगवान घोडदौड, वर्षभरात 56 कोटींची कमाई ; कोरोनात प्रवासी नसले तरी मालवाहतुकीतून उत्पन्न


 

एसटी सेवेसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महत्त्वाचे असून, पहिल्या, दुसऱ्या स्तरांत १०० टक्के प्रवासी वाहतूक, तर तिसऱ्या, चौथ्या स्तरांत ५० टक्केच प्रवासी वाहतूक राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सुरू केली जाणार आहे.

गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे २३ मार्चपासून एसटीची सेवा बंद आहे. अत्यावश्यक सेवेतील काही फेऱ्या वगळता राज्यभरात सार्वजनिक प्रवासी सेवा बंदच होती. लॉकडाऊन संपल्यानंतर १७ सप्टेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली होती.

ST begins its service from today

महत्त्वाच्या बातम्या