हे कसले कोरोनाविरुध्द लढण्याचे आदर्श मॉडेल, देशातील सर्वाधिक मृत्यूसह महाराष्ट्राने गाठला एक लाख कोरोना बळींचा टप्पा

महाराष्ट्रातील कोरोनाविरुध्दच्या लढाईचे कौतुक केले जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. संपूर्ण देशात साडेतीन लाख मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ देशातील मृत्यूमुखी पडलेला प्रत्येक तिसरा माणूस महाराष्ट्रातील आहे.Is this an ideal model to fight against corona, Maharashtra reaches the milestone of one lakh corona victims with the highest number of deaths in the country


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाविरुध्दच्या लढाईचे कौतुक केले जात असतानाच महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. संपूर्ण देशात साडेतीन लाख मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ देशातील मृत्यूमुखी पडलेला प्रत्येक तिसरा माणूस महाराष्ट्रातील आहे.

देशात कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रकोप महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येसह सर्वात जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या लाखाच्या वर गेली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात 100130 लोकांचा जीव गेला आहे. दुसऱ्या क्रमांकांवर कर्नाटक आहे. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात 70 हजार अधिक मृत्यू झाले आहेत.

कोरोनामुळं भारतासह जगातील केवळ सात देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. सध्या कोरोनाची साखळी काही अंशी तोडण्यात यश मिळालं आहे. देशासह महाराष्ट्रात आकडे कमी येत आहेत. वल्डोर्मीटरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे.

फ्रान्समध्ये 1.09 लाख लोकांचा मृत्यू झाला. रशिया (1,23,436 मृत्यू), इटली (1,26,472 मृत्यू), यूके (1,27,836 मृत्यू), भारत (3,46,784 मृत्यू), ब्राझील (4,72,629 मृत्यू) आणि सर्वात जास्त मृत्यू हे अमेरिकेत (6,12,203 मृत्यू) झाले आहेत.

महाराष्ट्रात नव्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या काहीशी कमी झाली आहे. तरीदेखील देशात सर्वाधिक रुग्णसंख्या अजूनही महाराष्ट्रतच आहेत. राज्यात आज 12 हजार 557 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रिकव्हरी रेट 95.05 टक्के झाला आहे. आज 233 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,85,527 सक्रीय रुग्ण आहेत.

Is this an ideal model to fight against corona, Maharashtra reaches the milestone of one lakh corona victims with the highest number of deaths in the country

महत्त्वाच्या बातम्या